शिवप्रहार न्यूज- एकलहरेत चोऱ्यांचे सत्र सुरूच ; ताके वस्तीवर चोरांनी २ गायी चोरल्या …
एकलहरेत चोऱ्यांचे सत्र सुरूच ; ताके वस्तीवर चोरांनी २ गायी चोरल्या …
रिजवान जहागीरदार कडुन ..
टिळकनगर-श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून काल रात्री दीड वाजेच्या सुमारास बेलापूर-कोल्हार रस्त्यावरील तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार आजम शेख यांच्या घरासमोरील ताके वस्तीवर अज्ञात वाहनातून 2 गाया चोरीला गेल्याची घटना घडल्याने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत प्रभाकर हनुमंत ताके यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी उक्कलगाव येथील सीसीटीव्ही कॅमेर्याची तपासणी केली असता याच रस्त्यावरील असलेल्या दोन्ही ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्रीची वेळ असल्याकारणाने तपासला यश मिळाले नसल्याचे सांगितले गेले आहे. प्रभाकर ताके यांनी नुकत्याच दुपती 1 गाई घेतली होती. व त्याआधी त्यांच्याकडे एक कालवड होती. त्यातील एक गाय साधारणता दोन वेळीला 20 ते 22 लिटरप्रमाणे दुध देत होती. 1 लाख ते दीड लाखापर्यत किंमतीच्या 2 गाया असल्याची माहिती प्रभाकर ताके यांनी दिली आहे.
एकलहरे कार्यक्षेत्रात आठ दिवसापूर्वीच एकलहरे सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक नूरअहेमद आजम जहागीरदार यांच्या राहत्या घरासमोरून मध्यरात्री त्यांच्या स्वतःच्या मालकीची नवीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती अद्यापही त्याचा तपास पोलीस यंत्रणेला लावता न आल्याने पोलिसांबद्दल परिसरात तिव्र संताप व्यक्त होत आहे व चोरट्यांनाही पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न परिसरात उपस्थित होत आहे. एकलहरे कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ चालू आहे. या आधीही बऱ्याच चोरीच्या घटना घडत आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी या भागात विशेष लक्ष देऊन चोरांचे मुसक्या आवळल्या पाहिजे अशी जोरदार मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार आजम जहागीरदार, पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सरपंच रिजवाना अनिस शेख सह येथील नागरिकांनी केली आहे.