शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात शाहरुख गाठणचा खुन करणाऱ्या अशोकला LCB ने पुण्यात धरले ...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात शाहरुख गाठणचा खुन करणाऱ्या अशोकला LCB ने पुण्यात धरले ...

श्रीरामपुरात शाहरुख गाठणचा खुन करणाऱ्या अशोकला LCB ने पुण्यात धरले ...

   श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- जुन्या वादाच्या कारणावरुन मित्राने खुन केला असून श्रीरामपूर येथील शाहरूख उर्फ गाठण याच्या खुनाच्या गुन्ह्याची 24 तासांच्या आत उकल करून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला जेरबंद केले आहे.

    याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी साकीब उस्मान शाह,वय 20, धंदा मजुरी,रा. सुभेदारवस्ती,श्रीरामपूर यांचा मयत भाऊ नामे शाहरुख ऊर्फ गाठण उस्मान शाह याचा कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात फरशी मारुन जखमी करुन जिवे ठार मारल्याने श्रीरामपूर शहर पो.स्टे.गु.र.नं. 1072/23 भादवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक,नगर यांनी पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.

    नमुद आदेशान्वये पोनि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोकॉ/रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/ संभाजी कोतकर अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणेबाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास तात्काळा रवाना केले. पथक मयताचे कुटूंबियाकडे विचारपुस करत असताना मयताचे कुटूंबियांनी काही दिवसांपुर्वी मयत शाहरुख याचे अशोक साळवे याचे बरोबर वाद झाला होता अशी माहिती दिली. पथकाने त्या आधारे संशयीताचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. त्यामुळे पथकाचा संशय अधिक बळावला. पथकाने लागलीच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे त्याचा शोध घेता तो पिंपरी चिंचवड,जिल्हा पुणे येथे असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने पथकाने लागलीच पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे येथे जावुन संशयीत आरोपीचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेवुन तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले व त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक ऊर्फ बाबुरामा साळवे रा. नॉर्दन ब्रॉच, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडुन वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने माझा मयत शाहरुख शाह याचे सोबत वाद झाला होता, त्याचा राग मनात धरुन डोक्यात फरशी मारुन खुन केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. 

       सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक व डॉ.बसवराज शिवपुजे, उविपोअ, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.