शिवप्रहार न्युज - ममदापूर येथील कत्तलखान्यावर छापा;28 गोवंशांची सुटका…
ममदापूर येथील कत्तलखान्यावर छापा;
28 गोवंशांची सुटका…
राहता (प्रतिनिधी): दि. 5/10/23 रोजी DySP संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की,कदम वस्ती ममदापूर ता.राहाता येथील अक्षय भास्कर कदम याचे घराजवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये वसीम हानिफ कुरेशी, रा. ममदापूर संगनमत करून कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे आखुड दोऱ्याने बांधून ठेवलेबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेश दिल्याने पथकातील इरफान शेख,अशोक शिंदे,श्याम जाधव यांनी पंचासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून एक लाख 83 हजार रुपयाच्या गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली.तसेच दोन्ही आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक अशोक शिंदे यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नं. 600/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक नगर, श्रीमती स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,Dysp संदीप मिटके यांचेमार्गदर्शनाखाली हे.कॉ.इरफान शेख,पो. ना. अशोक शिंदे ,श्याम जाधव यांनी केली.