शिवप्रहार न्यूज- बेलापुरात धनंजय ची स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या...

बेलापुरात धनंजय ची स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या...
बेलापूर - बेलापूर गावातील धनंजय कपिल सिंग,वय 38 वर्षे, मूळ राहणार -आळंदी,तालुका-खेड,जिल्हा -पुणे याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेवुन व स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
गंभीररित्या भाजल्यामुळे त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले होते.परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक 72/2021 अन्वये काल रोजी नोंद घेण्यात आली आहे.
धनंजय सिंग या तरुणाने नेमक्या कोणत्या कारणाने पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या केली.याबाबत अधिक तपास पोलिसांकडून चालू आहे.