शिवप्रहार न्यूज- मंदिरे व दुकाने पूर्ण वेळ चालु न केल्यास झोपी गेलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल- मनसेचा इशारा...

शिवप्रहार न्यूज- मंदिरे व दुकाने पूर्ण वेळ चालु न केल्यास झोपी गेलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल- मनसेचा इशारा...

मंदिरे व दुकाने पूर्ण वेळ चालु न केल्यास झोपी गेलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल- मनसेचा इशारा...

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोनाच्या महामारीमध्ये दारूचे दुकान,हॉटेल व इत्यादी गर्दीचे ठिकाणे चालु असतांना नागरिकांचे श्रध्दास्थान असणारे मंदिरच बंद ठेवून सरकार व प्रशासनाला काय साध्य करायचे आहे. हेच नागरिकांना कळेनासे झाले आहे. दारूच्या दुकानामध्ये व हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहे. या मुळे करोनाच्या

प्रादुर्भाव वाढत नाही का? मंदिरात श्रध्देने धार्मिक लोक शिस्तप्रिय वागून दर्शन घेत असतात असे असतांना त्यांच्यासुळे कसा करोनाचा प्रादुर्भाव वाढु शकतो. 

          इतर राज्यांमध्ये सर्व धार्मिक स्थळे चालु असतांना महाराष्ट्र राज्यातच मंदिरामुळे करोना पसरतो काय? तसेच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ज्या पध्दतीने करोनाच्या नियमांत सवलत देवून दुकाने व अस्थापना पूर्ण वेळ चालु आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये ब्लाही ठराविक तालुक्यामध्ये रूग्ण संख्या जास्त आहे. अ.नगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे मोठे आहे. त्याचा विचार करून सर्वांनाच निर्बंध लावणे योग्य नाही. 

ज्या तालुक्यामध्ये रुग्णा संख्या कमी आहे, नियंत्रित आहे अशा तालुक्यातील दुकानदारावर यामुळे अन्याय होत आहे. 

        त्यामुळे व्यापारी, छोटे व्यावसायिक दुकानदार यांना प्रचंड आर्थिक नुकसानी सोसवे लागत आहे. याचा विचार करुन आपण शासन व प्रशासनाकडे पाठ पुरावा करून व्यापाऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान

टाळण्यासाठी प्रयत्न करावेत व यापुढील काळात बाजारपेठ शनिवार/रविवार बंद ठेवू नये तसेच बाजारपेठ पूर्ण वेळ चालु करावे. 

        त्याचे कारण असे कि सर्व प्रकारचे कामगार,कष्टकरी हे दिवसभर आपापले व्यवसाय उद्योगधंदे करुन सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान खरेदी करण्यासाठी येत असतात परंतु ४ वाजता संपूर्ण मार्केट बंद असल्याकारणामुळे त्यांना हवे असलेले वस्तु वेळेत मिळत नाही. त्यांना काही खरेदी करायची असल्यास आपले काम धंदे सोडून सकाळी १० च्या पुढे यावे लागते यामुळे अनेकांची रोजंदारी बुडत आहे. याची सुध्दा दखल शासन व प्रशासनाने घ्यावीत. 

      करोना महामारीच्या धाकाने नागरिकांची किती दिवस भयभीत अवस्थेत जगावे याचा सुध्दा विचार शासनाने करुन लवकरात लवकर निवडणुकीच्या काळात ज्या पध्दतीने प्रशासन काम करत असते. त्याच पध्दतीने प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने काम करावे. वेळप्रसंगी राजकीय पक्ष,मामाजिक संघटनांची मदत घेवून १००% लसीकरण पूर्ण करावे. जेणे करुन करोना आजारावराची भिती नागरिकांमधून निघून जाईल

व नागरिकांचे मनौधैर्य वाढेल या कामांसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करुन नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. 

       येत्या ४ ते ५ दिवसांत आमच्या मागण्यापूर्ण न झाल्यास झोपी गेलेल्या शासन व प्रशासनाला जाग आणण्यासाठी विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. मग होणाऱ्या परिणामांस आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.     

         या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्यासह जिल्हा सचिव तुषार बोबडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय नवथर , शहराध्यक्ष, गणेश दिवसे,मनविसे शहराध्यक्ष विशाल शिरसाठ,शहर संघटक निलेश सोनवणे शहर सरचिटणीस रोहित जाऊनजाळ शहर चिटणीस ईश्वर जगताप, शहर उपाध्यक्ष निलेश लांबोळे, तालुका चिटणीस विष्णू अमोलिक, तालुका उपाध्यक्ष प्रवीण कारले, शिवनाथ फोपसे,

मनविसे तालुका सचिव विकी राऊत, तालुका उपाध्यक्ष अतुल तारडे, मनविसे शहर चिटणीस संकेत शेलार, मनविसे शहर उपाध्यक्ष रतन वर्मा, विभाग अध्यक्ष मारुती शिंदे, शाखाध्यक्ष अमोल फोपसे, आदीच्या सह्या आहे.