शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरातील भुयारी गटार घोटाळ्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी..

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरातील भुयारी गटार घोटाळ्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी..

श्रीरामपुरातील भुयारी गटार घोटाळ्याबाबत

आज हायकोर्टात सुनावणी....

श्रीरामपूर- सन २०१९ मध्ये उघडकीस आलेल्या शहरातील भुयारी गटार घोटाळ्याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुरक्र.६१८/२०१९ भादंवि कलम ४०३,४०६,४०९,४२० इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास पुढे अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एक आरोपी दशसहस्र्त सोल्युशन,ठाणे या कन्सल्टंट कंपनी चा संजय व्यंकटेश दहश्री याने औरंगाबाद उच्च न्यायालयात(खंडपीठ) अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याच्या अर्जावर आज उच्च न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे.

या गुन्हातील काही आरोपींचा उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजुर झाला असुन त्यात एका माजी नगराध्यक्षांसह,दोन तत्कालीन मुख्याधिकारी अशा उच्चपदस्थ मंडळींचा सामावेश आहे.