शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर बाजार समितीत पेरूला उच्चांकी ६० रुपये किलो भाव ! 

शिवप्रहार न्युज -   श्रीरामपूर बाजार समितीत पेरूला उच्चांकी ६० रुपये किलो भाव ! 

श्रीरामपूर बाजार समितीत पेरूला उच्चांकी ६० रुपये किलो भाव ! 

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज )- सध्या श्रीरामपूर बाजार समिती आवारात फळ व भाजीपाला लिलावात कांदा,डाळिंब, गवार, मेथी ,कोथिंबीर यांना जादा भाव मिळत असून विशेष म्हणजे डाळिंबाबरोबरच आता पेरूनेही भावात उचल खाल्ली आहे.ज्येष्ठ पत्रकार,प्रगतशील शेतकरी मनोजकुमार आगे यांनी त्यांच्या शिवशंकर मळ्यातील पेरू आज बाजार समितीत याकूबशेट बागवान यांच्या लिलाव केंद्रावर विक्रीसाठी आणले होते.विशेष म्हणजे या पेरूला उच्चांकी भाव मिळत ६०रुपये प्रति किलो दराने होलसेल भाव मिळाला ! 

      गेल्या आठ दिवसापासून पेरू लिलावासाठी नेण्यात येत होते.सुरुवातीला ३५ रुपये दर मिळाला नंतर ४० रुपये व आज विक्रमी ६० रुपये दर मिळाला.त्यामुळे डाळिंबाबरोबरच पेरू नेही आज भाव खाल्ला ! यावर प्रतिक्रिया देतांना ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे म्हणाले की,शेतकऱ्यांनी सर्वांनी सोयाबीन लावणे !सर्वांनी कांदा लावणे ! सर्वांनी ऊस लावणे !सर्वांनी गहू करणे ! या ऐवजी शेतीचे योग्य नियोजन करून ,वेगवेगळी पिके घेऊन, मोजकी पिके घेऊन,तीही चांगल्या दर्जाची पिके घेतल्यास शेतकऱ्यांना निश्चितच चांगला दर मिळेल.माजी उपनगराध्यक्ष याकूबशेठ बागवान यांनी सांगितले की,आजचा हा पेरूचा दर विक्रमी असल्याने चांगला माल असल्यावर निश्चितच चांगला दर मिळतो हे श्री.आगे यांच्या पेरूवरून दिसून येते.श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती श्री.नवले यांनीही शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रमाणीक प्रयत्न करावेत असे सांगितले .