शिवप्रहार न्युज- श्रीरामपूर जिल्हयासाठीच्या लाक्षणिकउपोषणाला सर्वपक्षीयांचे मोठे समर्थन; ०२ जानेवारीला विराट मोर्चा…
श्रीरामपूर जिल्हयासाठीच्या लाक्षणिक
उपोषणाला सर्वपक्षीयांचे मोठे समर्थन; ०२ जानेवारीला विराट मोर्चा…
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर जिल्हा मोहीत अंतर्गत श्रीरामपूर जिल्हयाच्या मागणीसाठी आज शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी शहरातील गांधी पुतळयासमोर श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने बिगरराजकीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. या लाक्षणिक उपोषणामध्ये श्रीरामपुरातील सामान्य श्रीरामपूरकरांसह व्यापारी, सर्वपक्षीय राजकारणी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रमुख व शिवप्रहाचे मावळे सहभागी झाले होते.
यावेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येक भागात, गल्लीत, परिसरात जिल्ह्यासाठी जनजागृतीच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत असून या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सर्वच मनोगत व्यक्त करणारांनी केले. हे लाक्षणिक उपोषण भाजपचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी यांच्या विनंतीवरुन सोडण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे प्रमुख प्रताप नाना भोसले म्हणाले की, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सर्व प्रमुख नेते मंडळींची भेट घेऊन त्यांना या लढ्यात सहभागी करुन घेणार असल्याचे सांगत विभाजन झाले तर श्रीरामपूरच होईल अन्यथा जिल्ह्याचे विभाजन होणार नाही, तसेच येत्या 2 जानेवारी 2024 रोजी श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवप्रहारचे प्रमुख,माजी PSI सुरजभाई म्हणाले की, शासकीय कार्यालयामधील प्रमुख कार्यालये श्रीरामपूरमध्ये असून श्रीरामपूरच जिल्हा मुख्यालय व्हावं. देशात प्रभू श्रीरामांच्या नावाचे भव्य राममंदिर बनवू शकते तर प्रभू श्रीरामांच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा का नाही? तसेच श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सुरु असलेल्या या मोहिमेमध्ये सर्वांनी बिगरराजकीय पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मा. आमदार चंद्रशेखर कदम यांनी मी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सुरु असलेल्या लोक चळवळीत सुरुवातीपासून असून श्रीरामपूर जिल्हा होईपर्यंत मी आपल्या बरोबर राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, मा.आ. भाऊसाहेब कांबळे, नितीन दिनकर, सभापती सुधीर नवले,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम झंवर यांच्यासह अनेकांनी श्रीरामपूर जिल्हा मोहिमेसाठी सर्वपक्षीय पाठिंबा देवून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा कृती समितीचे प्रमुख प्रताप नाना भोसले, शिवप्रहार प्रतिष्ठाने प्रमुख माजी PSI सुभरभाई आगे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, मा. आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, भाजपाचे नितीन दिनकर, चंद्रशेखर आगे, व्यापारी असो.चे अध्यक्ष पुरुषोत्तम झंवर, बाळासाहेब खाबिया, प्रविण गुलाटी, देविदास देसाई, वरुण आग्रवाल, विजय नगरकर, संजय कासलीवाल, निलेश बोरावके, गौतम उपाध्ये, अनिल लुल्ला, नागेशजी सावंत, अशोकजी बागुल,छावाचे सुभाष जंगले,मुजफ्फर शेख, मुक्तार शहा, अण्णासाहेब डावखर, संजयजी गांगड, टिलक डुंगरवाल ,सरवरअली सय्यद, रज्जाक पठाण, जोएब जमादार, बाळासाहेब भोसले, रुपेश हरकल, आनंद खर्डे, नितीन पटारे, सदा कराड यांच्यासह व अनेक श्रीरामपुरकरांसह शिवप्रहार प्रतिष्ठानचे मावळे मोठया संख्येने उपस्थित होते.