शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील बस आगारात चोरी ….

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील बस आगारात चोरी ….

श्रीरामपूर शहरातील बस आगारात चोरी ….

श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळ श्रीरामपूर आगारात काल चोरीची घटना घडली आहे. काल दिनांक 3 जानेवारी रोजी श्रीरामपूर आगारातून अज्ञात चोरट्याने सकाळी 10 च्या सुमारास बसच्या खिडकीच्या काचा, काचाच्या फ्रेम व फिटींग रबर चोरुन नेले. 

       याप्रकरणी सुनिल गोरक्षनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाघचौरे हे करित आहे.