शिवप्रहार न्युज - बाभळेश्वर जवळ 500 किलो गोमांससह “पुन्हा एक स्विफ्ट” डिझायर कार जप्त…
बाभळेश्वर जवळ 500 किलो गोमांससह “पुन्हा एक स्विफ्ट” डिझायर कार जप्त…
(प्रतिनिधी): दि. 21/11/2023 रोजी शिर्डी डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, ममदापूर गावातून एका पांढरे रंगाचे स्विफ्ट डिझायर कारमधून गोवंश जातीचे जनावराचे मांस विक्रीकरिता घेऊन जात आहे. त्याबाबत आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी बाभळेश्वर ते श्रीरामपूर जाणारे रोडवर बाभळेश्वर शिवारात विद्या विकास शाळेसमोर रोडवर सापळा रचून थांबले असताना श्रीरामपूरकडून एक संशयित पांढरे रंगाची स्विफ्ट कार येताना दिसली.
पोलीस व पंचांची खात्री होताच सदर वाहन चालकाला हात दाखवून गाडी थांबवण्याच्या इशारा करता त्यांनी वाहन थांबविले.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव-गाव विचारता त्याने त्याचे नाव सालीम निसार मणियार,वय 21,रा. मंगळवार पेठ मोमीन गल्ली जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे असे सांगितले त्याचे ताब्यातील डिझायर कारची पाहणी करता त्यामध्ये गोवंश जातीचे जनावराचे मांस असल्याची खात्री झाल्याने कार चालक आणि स्विफ्ट डिझायर कार नंबर MH 42 AV 43 वाहनांमध्ये गोवंश जातीचे जनावरांचे 500 किलो मांस ताब्यात घेऊन सदर चालकाविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 672/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 (सुधारित2015) चे कलम 5(अ).5(क).9(अ)9(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या पंधरवाड्यात गोमांस नेतांना स्विफ्ट एका कारवर नगर शहरात कारवाई झाली होती.त्यातील आरोपी कुरेशी हा श्रीरामपूरचा होता.स्विफ्ट कार ने गोमांस नेतांना पोलीस कारवाईची पंधरा दिवसातील ही दुसरी पोलीस दुसरी घटना आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक नगर, स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, dysp संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक शिंदे, श्याम जाधव, असीर सय्यद, HC जोसेफ साळवी यांनी केली आहे.