शिवप्रहार न्युज - गुहा येथे झालेला हल्ला व वक्फबोर्ड रहित करण्याबाबत वारकरी परिषदेचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन…
गुहा येथे झालेला हल्ला व वक्फबोर्ड रहित करण्याबाबत वारकरी परिषदेचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन…
नगर- राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने गुहा येथील घटनेसंदर्भात राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खालीलप्रमाणे निवेदन देण्यात आले आहे.
नामदार श्री. देवेंद्रजी फडवणीस गृहमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
अर्जदार:- राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य
विषय:- अहिल्या नगर मुक्काम पोस्ट गुहा येथे झालेल्या वारकरी संप्रदाय यांच्यावर झालेला हल्ला व वक्फबोर्ड रहित करण्याबाबत.....
महोदय,
वरील विषयांवर मौजे गुहा येथील श्री कानिफनाथ मंदिरात सोमवार दिनांक 13/ 11 /2023 रोजी आमचे वारकरी भजन करत असताना काही मुसलमान समाजकंटकांनी भजन करत असलेल्या आमच्या वारकरी बांधवांना व भगिनींना धक्काबुक्की करत वारकऱ्यांचा अमूल्य ठेवा असलेले टाळ, मृदुंग यांची तोडफोड केली व श्री पांडुरंग परमात्म्याच्या कपाळी असलेला पवित्र बुक्का यांची विटंबना करून महिला वारकरी यांना दमदाटी करून शिवीगाळ केली.
तसेच हिंदू पुजारीला व वारकऱ्यांना जबर मारहाण केली. या सर्वांच्या निषेधार्य संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय नाराज झालेला असून त्या संदर्भात वारकरी निषेध करत आहेत. त्यासाठी मंगळवार दिनांक 21 /11/ 2023 रोजी राहुरी तहसील येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेच्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे निदर्शनास येते तसेच धर्मांध मुसलमान हे बायका मुलांसहित वारकऱ्यांना मारहाण करण्यास आले होते याचा व्हिडिओ सर्वत्र बघायला मिळत आहे. भजनाच्या ठिकाणी पावित्र्य भंग करण्यासाठी बिडी ओढत धूम्रपान करीत, शिवीगाळ, धक्काबुक्की व जबर मारहाणद्वारे वारकऱ्यांच्या साधनेमध्ये व्यक्तय आणून महापाप करण्यात आले आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा समाजकंटक मुसलमानांवर तातडीने कारवाई करावी.
यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री कानिफनाथ महाराज मंदिरची जागा वक्फ बोर्ड द्वारे ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. धर्मांध मुसलमान यांनी अशा पद्धतीने हिंदूंचे पवित्र मंदिर आपल्या ताब्यात बळकवण्याकरता हे प्रयत्न केलेले आहेत. हा वक्फ बोर्डाचा कायदा काँग्रेसने केलाय तो रहित करण्यात यावा. याद्वारे या समाजकंटक मुसलमानांनी अनेक गड, किल्ले, धार्मिक स्थळे येथे अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे हिंदूंचे धार्मिक, ऐतिहासिक स्थळे नष्ट होणार असून भविष्यात दोन धर्मियात तणाव होणार आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेस सरकारने ने वक्फ बोर्डाचा कायदा बनून हिंदूंना चांगलेच बनवलेले आहे. असा कायदा रहित करून हिंदूंच्या जागा, गडकिल्ले इत्यादी हिंदूंच्या ताब्यात मिळाव्यात ही नम्र विनंती आहे. काँग्रेस सरकार मुसलमानांच्या हितासाठी व हिंदूंना नष्ट करण्याकरताच असा कायदा करते त्याप्रमाणे भाजपा सरकारनेही हिंदू हिताचा कायदा करून हिंदूंना, वारकऱ्यांना न्याय द्यावा. ही नम्र विनंती
आपला विश्वासू
ह. भ. प. मारुती महाराज तुंनतुने शास्त्री
अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परिषद
दु. क्र. 9975572684.