शिवप्रहार न्युज - शासकीय कॉन्ट्रॅक्टरकडून ४० हजाराची लाच घेताना महिला सरपंचासह नवऱ्याला रंगेहात पकडले...
शासकीय कॉन्ट्रॅक्टरकडून ४० हजाराची लाच घेताना महिला सरपंचासह नवऱ्याला रंगेहात पकडले...
श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच उज्वला सतीश राजपूत व त्यांचे पती सतीश बबन राजपूत यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय कॉन्ट्रॅक्टरकडून त्याचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये चाळीस हजाराची लाज घेताना आज गुरुवारी रंगेहात पकडले.
सदर शासकीय कॉन्ट्रॅक्टर हा जामखेड येथील राहणारा असून त्याचे ०४ लाख ६१ हजार रुपयांचे बिल ग्रामपंचायतीकडे थकीत होते.रस्ता दुरुस्ती व भिंत संरक्षण बांधकाम यासंदर्भातले हे कॉन्ट्रॅक्ट होते.
नमुद कारवाई डीवायएसपी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे व लाचलुचपत नगर विभागाच्या पथकाने आज रोजी केली.