शिवप्रहार न्युज - परमपूज्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना पैठण येथे 'महाभागवत' उपाधी प्रदान…
परमपूज्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना पैठण येथे 'महाभागवत' उपाधी प्रदान…
प्रतिनिधी/श्रीरामपूर -
(मयुर फिंपाळे यांजकडून)
कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना पैठण येथे आयोजित सोहळ्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते 'महाभागवत' ही विशेष उपाधी प्रदान करण्यात आली.
शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज समाधी चतुः शतकोत्तर रोप्य महोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत जयंती सुवर्ण महोत्सव निमित्त श्रीक्षेत्र पैठण येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्या प्रसंगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना 'महाभागवत' ही विशेष उपाधी प्रदान करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत,शांतिब्रम्ह एकनाथ ह.भ.प श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या हस्ते श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना 'महाभागवत' ही विशेष उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी गहिनीनाथ औसेकर, गुरुबाबा औसेकर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथाचे अभ्यासक व या ग्रंथाला प्राण मानणाऱ्या राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज व उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या कार्या बद्दल विशेष शब्दात
गौरव केला.