शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुर शहरातील गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा;Dy.s.p संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई,1,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुर शहरातील गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा;Dy.s.p संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई,1,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त...

श्रीरामपुर शहरातील गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा;Dy.s.p संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई,1,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त...

(श्रीरामपूर प्रतिनिधी)-आज दि. 22/10/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोंधवणी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला. 

          आरोपी. क्र.) 1 अशोक काशिनाथ शिंदे 

45,500/- रु. कि.चे 650 लिटर 

 गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)आरोपी. क्र.) 2. मंगल कचरू गायकवाड

42,000/- रु. कि.चे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3000/- रू किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 3. बाप्पू नागू गायकवाड

45,500/- रु. कि.चे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4. अर्जुन दौलत फुलारे

42,000/- रु. कि.चे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3000/- रू किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

-----------------------------------

 एकूण 1,88,000/- रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पो. स्टे. येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

          भल्या पहाटे अचानक केलेल्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे गोंधवणी येथील महिलां कडून Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक होत आहे.

        सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके , ASIराजेंद्र आरोळे,. पो. कॉ. नितीन शिरसाठ, व आर. सी. पी. पथक श्रीरामपूर आदींनी केली.