शिवप्रहार न्युज - लाखोंच्या गुटख्यासह श्रीरामपूरचे आरोपी पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
लाखोंच्या गुटख्यासह श्रीरामपूरचे आरोपी पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करीता वाहतुक करणा-या श्रीरामपूरच्या 3 आरोपीं विरुध्द कारवाई करुन 12,40,000/- रु. किंचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशो की, मा.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, यांनी पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/सचिन आडबल, पोना/संतोष खैरे, पोकॉ/शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ अशांना बोलावुन अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे 1) शाहरुख शहा, 2) नदीम शेख व 3) रिजवान शेख सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर हे त्यांचा हस्तक नामे दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा हा राजु शेख व वसीम रा. बीड यांचेकडुन खरेदी करुन, विक्री करण्याचे उद्देशाने अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व टाटा इंडीगो कार यामधुन बीड जामखेड मार्गे नगर शहरात विक्री करण्यासाठी येणार आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि. दिनेश आहेर यांनी दिनांक काल रविवार दि.07/01/2024 रोजी प्राप्त माहिती पथकास देवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने. पथकाने लागलीच पंचांना सोबत घेवुन जामखेड रोडने चिचोंडी पाटील गावचे शिवारा 22.15 वा.चे सुमारास सापळ लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात वरिलप्रमाणे वाहने येताना दिसल्याने दोन्ही संशयीत वाहनांना बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करुन दोन्ही गाड्या थांबवुन गाडीतील इसमांना पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) दानिश मोहंमद सय्यद वय 21, 2) जाकिर कादर शेख वय 24, दोन्ही रा. सुभेदारवस्ती, ता. श्रीरामपूर व 3) अफसर हसन पठाण वय 20, रा. जवाहरवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.
पंचा समक्ष संशयीतांचे ताब्यातील वाहनांची पाहणी करता त्यमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला, गुटखा मिळुन आल्याने त्याबाबत अधिक विचारपुस करता आरोपींनी सदर माल हा 4) शाहरुख शहा (फरार), 5) रिजवान शेख (फरार) व 6) नदीम शेख (फरार), दोन्ही रा. वॉर्डा नं.2, ता. श्रीरामपूर यांचे सांगणेवरुन 7) राजु शेख (फरार) व 8) वसीम (फरार) दोन्ही रा. मोमीनपुरा, जिल्हा बीड यांचेकडुन घेवुन आलो असल्याची माहिती दिल्याने आरोपींना विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण 12,40,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे ने. स्थागुशा नगर यांच्या फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 10/2024 भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई मा.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, मा.संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.