शिवप्रहार न्युज - विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोल्हार प्रखंड यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी...
विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोल्हार प्रखंड यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी...
कोल्हार/लोणी -मुब्रा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शरद पवार गट चे विधानसभा सदस्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्रीरामबद्दल एकेरी उल्लेख करत प्रभूच्या आहार,वनवास याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले आहे. श्रीरामांनी वनवासाला निघताना फळे,मध व कंदमुळे यावर आपले जीवन निर्वाह करेन असा संकल्प केला व मग ते वनवासासाठी बाहेर पडले. कुठलाही अभ्यास नसताना हिंदू समाजात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आव्हाड हे करत आहेत.याबरोबर त्यांनी वेदांचा पण अपमान केला आहे.
22 जानेवारी 2024 रोजी श्री रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार असून सर्व भारतीयांचे व जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. हिंदू समाजाच्या व भारतीय जीवनाच्या इतिहासात हा अविस्मरणीय सोहळा असणार आहे.
सर्व जगातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती या पवित्र सोहळ्यात उपस्थित असणार आहेत.या सर्व काळात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशात जातीय दंगली घडवून आणण्याचा कट रचला असावा अशी शंका येते हा सोहळा उधळून लावण्यासाठी हे सर्व आव्हाड करीत आहेत...
म्हणून विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल कोल्हार प्रखंड यांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोणी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.यावेळी बजरंग दलकोल्हार प्रखंड संयोजक ईश्वर टिळेकर,कोल्हार संयोजक रोहित जोशी,कोल्हार सह संयोजक दिनेश राकेचा,शिवराज विखे,योगेश साबळे सौरभ लहामगे,गुरव महाराज,स्वप्नील वर्पे,प्रशांत कोतवाल अदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.