शिवप्रहार न्युज - अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या आत्म्याला शांती व आनंद !

शिवप्रहार न्युज -  अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या आत्म्याला शांती व आनंद !

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या आत्म्याला शांती व आनंद !

मुंबई (शिवप्रहार न्युज )- आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ! चव्हाण यांचे कुटुंब व कॉग्रेसचे गांधी कुटुंब यांचे तीन पिढयाचे संबंध ! कॉग्रेससाठी स्वर्गीय शंकरराव चव्हाण त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण यांनी जीवन समर्पित केले होते ! स्व. शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री त्यानंतर केन्द्रीय मंत्री झाले ! स्व. शंकरराव चव्हाण हे व त्यांचे कुटुंबीय भारतीय संस्कृती जपणारे व धार्मिक वृत्तीचे आहे ! त्यांनी कधीही कॉग्रेसचा सेक्युलरवाद ! घरात येवू दिला नाही !स्वर्गीय शंकराव चव्हाण यांनी मराठवाड्याचे कल्याण करणारे जायकवाडी धरण बांधले त्याला नाथसागर नाव देण्यात आलेले आहे.आपल्या सत्तेचा वापर आपल्या भागातील जनतेला कायमस्वरूपी व्हावा असे हे पाण्याचे काम चव्हाण कुटुंबाने केले.स्वर्गीय शंकराव चव्हाण अतिशय धार्मिक वृत्तीचे होते ते नेहमी शिर्डीच्या साईबाबांना दर्शनासाठी यायचे त्यावेळी त्यांचे जिगरी साथीदार स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे व त्यांचे कुटुंबीयांचे मोठे जिव्हाळ्याचे संबंध होते आजही आहेत.

      धार्मिक वृत्तीमुळे शंकरराव चव्हाण हे नेहमीच काँग्रेस पक्षात चर्चेत राहिले ! अतिशय शिस्तबद्ध व प्रामाणिक कार्यपद्धती हा चव्हाण कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे.स्वर्गीय शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांच्या 75 वी चा कार्यक्रम दिल्लीतल्या विज्ञान भावनामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीचे पंतप्रधान तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ,विरोधी पक्षातीलशरद यादव तसेच देशभरातील प्रमुख राजकीय नेते त्यात महाराष्ट्रातील स्व.बॅ. अ .र . अंतुले ,सुशिलकुमार शिंदे ,शरदराव पवार यांच्यासह सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला मला दिल्लीला वडील स्व.शंकरराव आगे हे ज्येष्ठ पत्रकार असल्याने त्याचे बरोबर जाण्याचा योग आला.या कार्यक्रमात आम्ही अनेक प्रमुख नेत्यांना भेटलो त्यांच्याबरोबर जेवणाचा आस्वादही झाला.याची आठवण यासाठी की स्वतः जेवणाची व्यवस्था अशोकराव चव्हाण हे जातीने पाहत होते.असो आज स्वर्गीय शंकराव चव्हाण असते तर ते काँग्रेसमध्ये असले तरी श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला निमंत्रण असते तर नक्कीच गेले असते !आत्ताच्या काँग्रेस नेत्यांप्रमाणे राहुल गांधी व इतरांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले तसे त्यांनी केले नसते ! इतके धार्मिक वृत्तीचे स्वर्गीय शंकराव चव्हाण होते.आज त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पार्टीत गेले ! 

       ज्या भाजपाने व मोदी सरकारने श्रीराम मंदिर उभारून श्रीराम जन्म भुमि आयोध्येचे पावित्र्य जपले ! देशाची धर्म, संस्कृती भक्कम केली ! अशा भाजपा पक्षात अशोकराव चव्हाणांनी प्रवेश केल्याने स्वर्गात स्व. शंकरराव चव्हाण यांच्या आत्म्याला निश्चीत आनंद होवून शांती लाभली असेल ! तुर्तास कॉग्रेसला मोठ्ठा धक्का चव्हाणांनी दिल्याने महाराष्ट्रात राजकीय भुकंप झाला आहे व एक दमदार अनुभवी नेतृत्व भाजपाला मिळाले आहे .

शब्दांकन-

ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे.