शिवप्रहार न्युज - मराठे काय असतात हे सरकारने १५-१६ तारखेनंतर पहावे-मराठायोद्धा जरांगे पाटील... 

शिवप्रहार न्युज -  मराठे काय असतात हे सरकारने १५-१६ तारखेनंतर पहावे-मराठायोद्धा जरांगे पाटील... 

मराठे काय असतात हे सरकारने १५-१६ तारखेनंतर पहावे-मराठायोद्धा जरांगे पाटील... 

जालना -अंतरवली येथे 10 फेब्रुवारीपासून विनाअन्न पाणी उपोषणास बसलेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईला सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी करत आहे.सरकारने अधिवेशन घेऊन सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचा कायदा करावा,हैदराबाद गॅझेट व शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्यावी.यावर चर्चा करायची असेल तरच माझ्याकडे या नाहीतर येऊ नका.15-16 फेब्रुवारी नंतर मराठे काय असतात हे सरकारला दाखवून देऊ,शिंदे-फडणवीस-पवार काय सरकार चालवत आहेत ? असे प्रतिपादन जरांगे पाटलांनी यावेळी केले.

           दरम्यान14 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदल अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.नगर जिल्ह्यामध्ये देखील या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.श्रीरामपूर तालुक्यातीलटाकळीभान,गोंडेगाव,भोकर यांसह इतरही गावात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.