शिवप्रहार न्युज - बेलापूरात सोरट जुगारावर छापा; गुन्हा दाखल

शिवप्रहार न्युज -  बेलापूरात सोरट जुगारावर छापा; गुन्हा दाखल

बेलापूरात सोरट जुगारावर छापा; गुन्हा दाखल

    बेलापुर (प्रतिनिधी)- बेलापुरातील चौकात सुरु झालेल्या सोरट नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकुन सोरट पान जप्त करुन श्रीरामपुरातील एका जणावर कारवाई केली पण काही वेळातच तो जुगार अड्डा पुन्हा सुरु झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.  

  बेलापुर गावात अवैध व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. दारु गुत्त्याबरोबरच मटका गुटखा जुगार जोमात सुरु असतानाच आता आणखी एका अवैध व्यवसायाची भर बेलापुरात पडली आहे. अवैध व्यवसायामुळे अनेक कष्टकरी मोलमजुरी करणारांचे प्रपंच उध्वस्त होत आहे. त्यात काही शाळकरी मुलेही या व्यवसायाच्या अहारी जात आहे. शिक्षणाच्या नावाखाली पैसे आणुन आँनलाईन गेम तिरट नावाचा जुगार खेळला जात आहे. बेलापुरात सुरु असलेले अवैध व्यवसाय कमी होते की काय आता आणखी एक सोरट नामक अवैध व्यवसाय सुरु झाला असुन या व्यवसायाला नेमका पाठींबा कुणाचा? असा सवाल सुज्ञ नागरीकांकडून विचारला जात आहे.

   याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, बेलापुरातील गजबजलेल्या ठिकाणी आझाद मैदानालगत एक इसम सोरट नावाचा हारजीतचा जुगार खेळवत असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांना मिळाली त्यांनी बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, पोलीस काँन्स्टेबल संपत बडे, वाघमोडे तसेच दोन पंचासमक्ष आझाद मैदाना शेजारील गाळ्यात छापा टाकला असता गाळ्यामध्ये एक इसम खोलीत चित्राचे पान ठेवुन काही इसमांना हार जीतचा जुगार खेळविण्यास प्रोत्साहीत करत होता. त्याचे नाव गाव विचारले आसता त्याचे नाव प्रेम शंकर जाधव-२९ वर्षे रा. वार्ड न ७ बोरावके नगर, श्रीरामपुर ता.श्रीरामपुर सांगीतले असे त्याचे पंचासमक्ष झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडे सोरट नावाचा हार जीत झुगाराची साधने मिळुन आली. एक मोठा चित्र असलेला कागद व खालच्या बाजुस चिट्ट्या चिटकवलेला सोरट पान. तसेच काही रोख रक्कम आढळून आली पोलीसांनी ते सर्व साहीत्य जप्त केले. सहाय्यक फौजदार हापसे यांनी पंचासमक्ष पंचनामा केला असुन प्रेम शंकर जाधव वय-२९ वर्ष रा. बोरावके नगर वार्ड नन ७ श्रीरामपुर याचे विरुद्ध महा. जुगार बंदी कायदा १२ (अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे. या बाबतची फिर्याद पोलीस काँन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांनी दिली आहे.