शिवप्रहार न्यूज- बेलापूर लव जिहाद प्रकरणातील हिंदू मुलगी धुळ्याला मिळाली;शिवप्रहार प्रतिष्ठान च्या प्रयत्नांना यश...

शिवप्रहार न्यूज- बेलापूर लव जिहाद प्रकरणातील हिंदू मुलगी धुळ्याला मिळाली;शिवप्रहार प्रतिष्ठान च्या प्रयत्नांना यश...

बेलापूर लव जिहाद प्रकरणातील हिंदू मुलगी धुळ्याला मिळाली;शिवप्रहार प्रतिष्ठान च्या प्रयत्नांना यश...

श्रीरामपूर- नगर जिल्ह्यामध्ये प्रचंड गाजलेल्या बेलापूर येथील लव्ह जिहाद प्रकरणातील 14 वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी ही आरोपी आयुब सिकंदर शेख ,वय 20 वर्ष, राहणार -बेलापूर ,तालुका श्रीरामपूर याच्या सह धुळे येथे श्रीरामपूर पोलिसांना मिळून आली आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी की,गेल्या हप्ताभरा पासून श्रीरामपूर पोलिसांची टीम धुळे,जळगाव या परिसरामध्ये मुलीचा शोध घेत होती.अखेर या प्रयत्नांना आज यश आले आहे. आज सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास ही अल्पवयीन हिंदु मुलगी व आरोपी असे दोघांनाही पोलिसांनी धुळे येथे ताब्यात घेतले.श्रीरामपूर पोलिसांची टीम या दोघांना घेऊन श्रीरामपूरकडे धुळ्याहून रवाना झाली आहे.

          या 14 वर्षीय गरीब कुटुंबातील अल्पवयीन हिंदू मुलीसाठी “शिवप्रहार प्रतिष्ठान”ने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वर ०९ ऑगस्ट २०२१ रोजी शेकडो “शिवप्रहार”च्या सळसळत्या रक्ताच्या मावळ्यांचा “इतिहासातील पहिला लव्ह जिहाद विरोधी मोर्चा” काढला होता.त्यानंतर १६ ऑगस्ट २०२१ रोजी “शिवप्रहार प्रतिष्ठान” च्या वतीने श्रीरामपूर शहर- बेलापूर गाव देखील बंद ठेवण्यात आले होते.या बंदला हिंदू समाजाच्या वतीने पूर्ण पाठिंबा देण्यात आला होता व कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता.

         “शिवप्रहार प्रतिष्ठान”चे प्रामाणिक (बिगरराजकीय)प्रयत्न,शिवप्रहारच्या मावळ्यांची ठाम भूमिका व हिंदू समाजाच्या भरघोस पाठिंब्यामुळे गोर- गरीब कुटुंबातील हिंदू समाजाच्या अल्पवयीन मुलीचे जीवन बरबाद होण्यापासुन वाचले.

            पोलिसांकडून देखील या गुन्ह्यातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे,श्रीरामपूरचे डीवायएसपी श्री.संदीप मिटके ,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संभाजी पाटील,पोलीस हवालदार लोटके,ढोकणे, महिला पोलीस शिपाई टोपे, पोलीस शिपाई हिवाळे व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पोलीस नाईक फुरकान शेख यांच्या पथकाने केली आहे.

        “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या सळसळत्या रक्ताच्या हिंदू मावळ्यांचे श्रीरामपुरसह परिसरातील सर्व हिंदु समाज आभार व्यक्त करत आहे.