शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात काल रात्री पुन्हा कावडीवाल्यांना मारहाण…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात काल रात्री पुन्हा कावडीवाल्यांना मारहाण…

श्रीरामपुरात काल रात्री पुन्हा कावडीवाल्यांना मारहाण…

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पुणतांब्याहून राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे निघालेल्या कावडीवाल्यांच्या अंगावर धावून त्यांना दमदाटी करण्याचा प्रकार श्रीरामपुरातील सय्यद बाबा चौकात काल रात्री १०.३० वा. घडला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

       याबाबतची अधिक माहिती अशी की, तमनर आखाडा, ता. राहुरी येथील मुळाबाई देवीची यात्रा असते.त्यासाठी काल तेथील मुलं पुणतांब्याला कावडीने पाणी आणायला आले होते. संध्याकाळी ६ वा. ही मुलं पाणी घेवून येथून निघाले. त्यानंतर रात्री १०.३० ला कावडीचे पाणी घेऊन हे मुलं श्रीरामपुरात पोहचले. श्रीरामपुरातील मस्जिदच्या जवळील ब्रिजपासून ही मुलं पुढे निघाल्यानंतर अचानक तीन-चार पोरं त्यांच्या अंगावर धावून येत 'तुमको जानसे मार दूंगा', असे म्हणत त्यांच्यातील एकाने कावडीतील तरणाच्या गुडघ्याला दगड मारून जखमी केले. यावेळी आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी सोडवासोडव केली. 

         याप्रकरणी जखमी १७ वर्षाच्या मुलाने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून दमदाटी, मारहाण करणाऱ्या चौघा अनोळखी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि.नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

यापुर्वीही कावडीवाल्यांवर हल्ला होण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यावरून शहराचे वातावरण बिघडलेले होते. आता पुन्हा यात्रोत्सव तोंडावर असताना हा प्रकार घडल्याने आणि कोणीतरी अपप्रवृत्ती मुद्दाम असा प्रकार घडवून आणत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने याची पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेत अशा अपप्रवृत्ती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शहरातील जागरुक नागरिकांनी केली आहे.