शिवप्रहार न्युज - सव्वा किलो सोन्याच्या दागिन्यांसह रोकड जप्त; LCB ची मोठी कारवाई...

शिवप्रहार न्युज -  सव्वा किलो सोन्याच्या दागिन्यांसह रोकड जप्त; LCB ची मोठी कारवाई...

सव्वा किलो सोन्याच्या दागिन्यांसह रोकड जप्त; LCB ची मोठी कारवाई...

   नगर (शिवप्रहार न्युज)- लोकसभा निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये 93,50,097/- रुपये किमतीचे सव्वा किलोपेक्षा जास्त सोने व रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) केली आहे.

  अधिक माहिती अशी की, निवडणुक आयोग तसेच जिल्हाधिकारी यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमाला 50,000/- रुपये पेक्षा जास्त अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही. 50,000/- रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळुन आल्यास जिल्हाधिकारी व निवडणुक आयोग यांना सुचित करावे लागते याबाबत आदेश आहेत. 

  काल शुक्रवार दिनांक 12/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे रमेशसिंह हेरसिंह राजपुत रा. राजस्थान हा कोणतेही अधिकृत बिले नसतांना त्याचे कब्जामध्ये सोन्याची विविध दागिने बाळगुन ते विक्री करण्याकरीता त्याचे एका साथीदारासह नगर जिल्ह्यामध्ये आला असुन ते सध्या तुलसी विहार लॉजिंग, माणिकचौक, नगर येथे थांबलेले असल्याची बातमी मिळाली. याबाबत पोनि. दिनेश आहेर यांना माहिती कळविली असता त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, मनोहर शेजवळ, रविंद्र कर्डीले, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, संतोष खैरे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन वरिल ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

  वरील पोलीस पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तुलसी विहार लॉजिंग, माणिकचौक, नगर येथे जावुन खात्री करता सदर लॉजमध्ये रमेशसिंह हेरसिंह राजपुत वय- 47 वर्षे, रा. बायोसा गल्ली, बेडा, बेरा, पाली, राजस्थान तसेच नारायणलाल हेमराज गाडरी वय - 27 वर्षे, रा. गाडरी मोहल्ला, धना की, भागल, ताना, चित्तौडगढ, आकोला, राजस्थान असे सोन्याचे विविध दागदागिने व रोख रकमेसह मिळुन आले. 

   यावेळी रमेशसिंह हेरसिंह राजपुत याच्याकडे 91,78,897/- रुपये किमतीचे 1311.28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने तसेच 34700/- रुपये रोख रक्कम व नारायणलाल हेमराज गाडरी याच्या कब्जामध्ये 1,36,500/- रुपये किमतीचे 19.500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे दोघांकडे मिळुन 93,15,397/- रुपये किमतीचे 1330.78 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 34,700/- रुपये रोख रक्कम असा एकुण 93,50,097/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. दोघांकडे त्यांच्या ताब्यात मिळुन आलेल्या दागिण्यांचे अधिकृत बिलाबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचेकडे कोणतेही अधिकृत बिले सोबत नसल्याचे सांगितल्याने सदरचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सोन्याचे दागदागिने व रोख रकमेबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी नगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व उपायुक्त आयकर विभाग पुढील कार्यवाही करत आहेत.  

   सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.