शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील महिलेचा संताप अनावर सोशल मेडीयावर महिलेचा व्हिडीओ व्हायरल ...

00:00
00:00

श्रीरामपुरातील महिलेचा संताप अनावर सोशल मेडीयावर महिलेचा व्हिडीओ व्हायरल ...


श्रीरामपूर – सरकारने पुन्हा सर्वसामान्य जनतेवर लॉकडाउन लादल्यामुळे हातावर पोट असणार्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे . अशीच एक सर्वसामान्य महिला जिचा पती आजार पणामुळे अंथूरणाला खिळून आहे तर तिचा मुलगा देखील काही काम करत नाही त्यामुळे तीन दिवसापासून या महिलेच्या घरात खायला अन्न नाही अशी माहिती ही लॉकडाउनमुळे सप्तंत झालेली महिला देत आहे .
                          या व्हिडीओमध्ये ती गरीब महिला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन समोर सरकारला शिव्याशाप देताना दिसत आहे.काम बंद केल्यामुळे आम्ही आता,काय खायचे,काय सरकारचे “ते” तोडून खायचे का ? 
असा सप्तंत सवाल ही गरीब महिला विचारतांना दिसत असून तिच्या सारखीच परिस्थिती अनेक गोर-गरीब ,जनसामान्य लोकांची झाली आहे. या लॉकडाउनमुळे कोणी घरातील सोने मोडून तर कोणी चीजवस्तू गहाण ठेवुन जगत आहे.
               सरकारने गोरगरिबांना मदत जाहीर केली आहे पण ही मदत भ्रष्टाचाराचा कॅन्सर झालेली सरकारी यंत्रणा वाटणार आहे . त्यामुळे गरजू पर्यंत किती मदत पोहचणार याबाबत शंका आहे. सरकारच्या या लॉकडाउनमुळे ‘आई जेवू घालीना आणि बाप भिक मागू देईना’ अशी गोरगरिबांची अवस्था झाली आहे.