शिवप्रहार न्युज - सरकारी वाळू डेपोच्या नावाने दिवसा वाळू चोरी, श्रीरामपुरात गुन्हा दाखल; आज पुन्हा कारवाई...
सरकारी वाळू डेपोच्या नावाने दिवसा वाळू चोरी, श्रीरामपुरात गुन्हा दाखल; आज पुन्हा कारवाई...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण गावात व गोदावरी नदीपात्रात नायगाव येथे सरकारी वाळू डेपोच्या नावाने परस्पर वाळू उत्खनन करून चोरून घेवून जातांना ३ डंपर ट्रक, १ टेम्पो, १ ट्रॅक्टर, ३ ट्रॉली अशा गाड्या चोरीच्या वाळूसह पकडल्या आहे.
परि. पोलीस अधिक्षक बोनिवाल यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा ही वाळू चोरी सरकारी ठेक्याच्या नावाखाली सुरु होती. पकडलेल्या गाड्यांचे मालक व चालक यांनी कोणतीही कागदपत्र सादर केली नाहीत. काल पोकॉ. वैभव काळे याच्या फिर्यादीवरून पकडलेल्या गाड्यांच्या मालकांवर व चालकांवर भादवी कलम ३७९, ५११, पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३, १, मोटार वाहन कायदा कलम १, ३०, १७० प्रमाणे श्रीरामपूर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून. पकडलेल्या वाहनांची किंमत सुमारे ४४ लाख रुपये इतकी आहे.
सरकारी वाळू डेपोच्या नावाखाली किती वाळूचोरी झाली ? कोणी केली ? मालक कोण ? चालक कोण ? ही वाळू चोरी दिवसा कोणाच्या आर्शिवादाने सुरु होती ? याचा तपास परि.पोलीस अधिक्षक बोनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोनि.चौधरी व पोसई निकम हे करीत आहे.
दरम्यान एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवारी भर दिवसा दुपारी परि. पोलीस अधिक्षक जीवन बोनिवाल यांनी श्रीरामपूर तालुक्यातील वांगी परिसरात छापा टाकूण वाळू चोरणारा जेसीब व एक डंपर गाडी पकडले असून दुपारी उशीरा ही कारवाई सुरुच होती. बोनिवाल यांनी दिवसा सरकारी वाळूवर दरोडा टाकणाऱ्यांना उघडे पाडले असून वाळूतस्कर व त्याला आर्शिवाद देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आयपीएस बोनिवाल, सपोनि.निकम, हेकॉ.रनवरे, आंधळे यांनी भर उन्हात ही वाळू चोरी पकडून कारवाई केली आहे.