शिवप्रहार न्युज - ग्रंथपाल - विद्यार्थी वादावर मुख्याधिकाऱ्यांना अंतिम तोडगा काढता येईना...
ग्रंथपाल - विद्यार्थी वादावर मुख्याधिकाऱ्यांना अंतिम तोडगा काढता येईना...
श्रीरामपूर - श्रीरामपूर नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य टिळक वाचनालयातील अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रंथपाल स्वाती पुरे यांच्याम्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाद चालू आहेत.
सेवाभावी हेतू ठेवून नगरपालिकेच्या वाचनालयात सुरू करण्यात आलेली अभ्यासिका धंदेवाईक बनवण्याचे काम पालिका प्रशासनाचे चालू आहे का ? अशी परिस्थिती आहे. कारण अभ्यासिकेची वार्षिक फी तब्बल १० पटीने वाढवून नगरपालिका प्रशासनाने अभ्यासिकेला धंदेवाईक करण्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे का? या नगरपालिकेच्या निर्णयाला अभ्यासिकेतील विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी विरोध केला तेव्हा या वादाची ठिणगी पडली.तसेच विद्यार्थ्यांनी आरोप लावले आहे की,ग्रंथपाल विद्यार्थ्यांना विनाकारण अपमानास्पद बोलतात, अरेरावी करतात ,तसेच बाथरुम लॅाक करून ठेवले जाते, अभ्यासिकेची साफसफाई केली जात नाही,प्यायला पाणी स्वच्छ दिले जात नाही, अभ्यास करण्यासाठीच्या फळ्यांना (लाकडी पॅड)परवानगी नाकारली जाते.अशा प्रकारे तक्रारींचा पाढा विद्यार्थ्यांनी नुकतेच मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडला.परंतु मुख्याधिकारी व प्रशासक प्रांत हे या प्रकरणावर हतबल झालेले दिसत आहे.अंतिम तोडगा अजुन निघालेलाच नाही.हा वाद पुन्हा उफळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे श्रीरामपुरात राजकारण करणारे काही सत्तेतील लोक त्यांच्या मलिदा खाण्याचा कामात,चमकोगिरी करण्यात व्यस्त आहे.त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही.प्रशासनाला धारेवर धरुन विद्यार्थी हिताचा निर्णय होणे आवश्यक आहे.