शिवप्रहार न्यूज - नगरमध्ये गोमांंस पकडले! मानलेल्या भावाला मारहाण, विनयभंग!! मुलीस पळविले !!!
नगरमध्ये गोमांंस पकडले! मानलेल्या भावाला मारहाण, विनयभंग!! मुलीस पळविले !!!
नगर/श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त खबरी वरून जिल्हा गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने नगर शहरात तीन ठिकाणी छापा टाकून गोमांस पकडले. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुप्त खबरीवरून पकडण्यात आलेल्या गोमांस प्रकरणी हेकॉ.घोडके यांच्या फिर्यादीवरून आरोपी इम्रान वाहीद कुरेशी रा-हमालवाडा, झेंडीगेट तसेच दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी असलम मुसा कुरेशी रा-झेंडीगेट या दोघांविरुद्ध कोतवाली पोलिसांत भादवि कलम 279, महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियम सन 1995 चे कलम 5, 9-अ प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तर तोफखाना पोलिसांत हेकॉ.पवार यांचे फिर्यादीवरून आरोपी सोहेले रऊफ शेख रा-भिंगार यांच्याविरुद्ध वरील कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींकडून गोवंश जनावरांचे कापलेले मांस, वजन, काटा, सुरा तसेच एका ठिकाणी जिवंत गाय वासरू पकडण्यात आले. पोनि.शिंदे व पोनि.गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.
दुसऱ्या घटनेत तोफखाना पोलिसांच्या हद्दीत कल्याण रोड भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात तिचा मानलेला भाऊ विलास व त्याचा मुलगा तुषार असे दोघे रात्री ८ः३०च्या सुमारास घरात बसून गप्पा मारत असताना तेथे आरोपी अक्षय आला. 'तू जास्त माजली आहे' असे म्हणत हात धरून ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. महिलेचा मानलेला भाऊ विलास व त्याचा मुलगा तुषार याला तिघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय, जगदीश व कार्तिक या तिघांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.
तिसऱ्या घटनेत श्रीरामपूर शहरालगत असलेल्या अशोकनगर परिसरातून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी उचलून पळवून नेले. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई देवरे हे आरोपी व अल्पवयीन मुलीचा कसून शोध घेत आहे.