शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात "अर्धवट डॉक्टर" वर गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात "अर्धवट डॉक्टर" वर गुन्हा दाखल...

श्रीरामपुरात "अर्धवट डॉक्टर" वर गुन्हा दाखल...

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सागर अहिरे याच्यावर अरुण शिंदे,रा-गोंघवणी, श्रीरामपूर यांच्या तक्रारीवरून वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातील कायद्यान्वये श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      आरोपी सागर अहिरे हा वडाळा महादेवच्या शरदचंद्र पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये चतुर्थ वर्षाची परीक्षा नापास झालेला आहे.परिक्षा पास होवुन पूर्ण डॉक्टर तो अजुन बनलेला नाही.त्याच्याकडे वैद्यकीय कौन्सिलचे व्यवसाय प्रमाणपत्र वा पदवी नाही.तरीदेखील या अर्धवट डॉक्टर ने माळेवाडी येथे ऍलोपॅथीची औषधे,इंजेक्शन,सलाईन बाटली इत्यादी साहित्य वापरून वैद्यकीय व्यवसाय केला व पेशंट तपासले. ह्या घटनेने माळेवाडीसह परिसरात खळबळ उडाली आहे.