शिवप्रहार न्युज - ०८ लाखाच्या मेंढ्या नेऊन मेंढपाळाची फसवणूक…
०८ लाखाच्या मेंढ्या नेऊन मेंढपाळाची फसवणूक…
श्रीरामपूर / राहाता ( शिवप्रहार न्युज) थोड्या-थिडक्या नव्हे तर तब्बल ८ लाखाच्या मेंढ्या नेवून पैसे न देता ५ मेंढपाळांची फसवणूक करण्याचा प्रकार राहाता तालुक्यात घडला! या प्रकाराने मेंढ्या-बकरी खरेदी व्यवहारात कसा फसवणूकीचा प्रकार घडतो हे समोर आले आहे.
याप्रकरणी मेंढपाळ सुनिल साधू राऊत रा. केलवड यांनी राहाता पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी सलमान हसन शेख, हसन दादाभाई शेख, गुडु हसन शेख, पप्पु हसन शेख रा. रांजणगांव खुर्द . ता . राहाता यांच्या विरुद्ध भादवि कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्यात सुनिल राऊत - १८ मेंढ्या,राहुल राऊत -१७मेंढ्या,ज्ञानदेव कांदळकर- २१ मेंढ्या ,सुधाकर बनकर ३३ मेंढया अशा ७ लाख ९४ हजार ९०० रुपयाच्या मेंढ्या नुमद आरोपी यांनी नेऊन फसवणुक केली असल्याचे म्हटले आहे. पोनि काकड यांचे मार्गदर्शना खाली हेकॉ झीने हे पुढील तपास करीत आहेत.या प्रकाराने गरीब मेंढपाळांमध्ये खळबळ उडाली आहे.