शिवप्रहार न्युज - अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल ०१ कोटींची खंडणी;नगरमधील महिलेंसह तिघांवर गुन्हा …

शिवप्रहार न्युज -  अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल ०१ कोटींची खंडणी;नगरमधील महिलेंसह तिघांवर गुन्हा …

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल ०१ कोटींची खंडणी;नगरमधील महिलेंसह तिघांवर गुन्हा …

  नगर (शिवप्रहार न्युज)- अश्लील व्हिडिओ व्हायरल करून तुमची बदनामी करू, अशी धमकी देत बीड जिल्हयातील आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांच्याकडे तब्बल एक कोटींच्या खंडणीची मागणाऱ्या न्यूज पोर्टलचा पत्रकार आणि त्याची साथीदार महिला यांच्यावर नगर येथील कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरामुळे जिल्हयात खळबळ उडाली असून नगरमध्ये पुन्हा हनीट्रॅपचा प्रकार पुढे आला आहे.

   याबाबतची अधिक माहिती अशी की, माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना पोर्टल चॅनेलचा पत्रकार सांगणारा भैय्या बॉक्सर उर्फ इस्माईल दर्यानी आणि केडगाव येथे राहणाऱ्या या महिलेने जानेवारी ते जून या दरम्यान नगर येथे हॉटेल रॉयल येथे धमकावले. हे दोघं ते जून माजी आमदार धोंडे यांना म्हणाले की, माझ्याकडे तुमची अश्लिल चित्रफित काढलेली आहे. ती मी समाज माध्यमांवर व्हायरल करील आणि तुमची सर्वत्र बदनामी करील. एवढेच नव्हेतर तुम्ही माझ्यावर बलात्कार केला, असे सांगून तुमच्या बलात्काराचाही गुन्हा दाखल करील, तुमची राजकीय राजकिर्द संपवून टाकू. जर तुमची बदनामी होऊ द्यायची नसेल तर आम्हाला तुम्ही १ कोटी रूपये द्यावे, अशी मागणी या दोघांनी माजी आमदार असणाऱ्या धोंडे यांच्याकडे केली. यातील २५ हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर यांनी स्विकारले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर धमकीनंतर माजी आमदार धोंडे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सदर तक्रारीनंतर पोर्टलचा पत्रकार म्हणून मिरवणारा इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर याला ताब्यात घेतले. त्यानंतर अश्लिल चित्रफित आपल्याकडे असल्याचे सांगणाऱ्या केडगाव येथील महिलेला पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   याबाबत, कोतवालीचे पोनि. प्रताप दराडे यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकार हा हनीट्रॅपचाच प्रकार असून या प्रकरणातील पोर्टलचा पत्रकार सांगणारा भैय्या बॉक्सर आणि केडगाव येथील राहणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.