शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरजवळ ४ दरोडेखोर पकडले; LCB ची कारवाई...
श्रीरामपूरजवळ ४ दरोडेखोर पकडले; LCB ची कारवाई...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूरजवळील उंबरगांव येथे दरोड्याचे तयारीत असलेल्या ४ आरोपींना ४ लाख २६ हजार ७०० रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्यांच्याकडून घरफोडीच्या २ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि. दिनेश आहेर यांना मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोनि. आहेर यांनी एलसीबीचे पोलीस पथक नेमून गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना देवून पथकास रवाना केले होते. त्यानुसार हे पथक जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोनि. आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे गुंड्या डिस्चार्ज काळे, रा. छत्रपती संभाजीनगर हा त्याचे ५ ते ६ साथीदारांसह २ मोटार सायकलवर येवून बेलापुर ते पढेगांव रोडवर काळभैरवनाथ मंदीराचे कमानीजवळ अंधारामध्ये थांबुन कोठे तरी दरोडा घालण्याचे तयारीत दबा धरुन बसलेले आहेत, आता गेल्यास मिळुन येईल. पोनि. आहेर यांच्या सूचनेनुसार या पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी बेलापुर ते पढेगांव रोडवर, काळभैरवनाथ मंदीराचे कमानी समोर, ता. श्रीरामपूर येथे जावुन खात्री करता काळभैरवनाथ मंदीराचे कमानी समोरील ओढयाचे पुलाजवळ, उंबरगांव शिवारात काही. संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले. पथक संशयीतांना पकडण्याचे तयारीत असतांना, त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन ०४ इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी तेथुन ०२ इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारामध्ये थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यावेळी त्यांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे स्वरुप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे, वय- २४, दऱ्या बरांड्या भोसले, वय-२५, आजब्या महादु भोसले, वय-२९, सर्व रा. अंतापुर, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर व कुलत्या बंडु भोसले, वय-२३, रा. बाबरगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या संशयीत इसमांचे नांव पत्ते विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे रवि ऊर्फ रविंद्र मुबारक भोसले (फरार) व सोहेल पठाण (फरार) दोन्ही रा. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे गुन्हयाबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी नेवासा व श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हें अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे २ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपींकडून एकुण ४,२६,७००/ - रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे.गु.र.नं. ६५५/२०२४. भादविक. ३९९, ४०२ सह आर्म ऍक्ट ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस प्रमुख राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.