शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाकडून जागेवर कोरोना चाचणी

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाकडून जागेवर कोरोना चाचणी

श्रीरामपुरात विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाकडून जागेवर कोरोना चाचणी...

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज सोमवारी सकाळपासूनच पोलीस व प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जागेवर कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव आल्यास या नागरिकाला थेट कोवीड सेंटर मध्ये भरती करण्यात येत असून कोरोना निगेटिव आल्यास दंडात्मक कारवाई प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे सकाळी छ. शिवाजी चौकातून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.
          दोन दिवसापूर्वी श्रीरामपुरात कोरोना रुग्णसंख्येने अचानक मोठी झेप घेतली होती. सरासरी 200 च्या आसपास असणारा  रुग्ण संख्येचा आकडा दोन दिवसापूर्वी चारशे च्या घराजवळ गेला होता. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याचे बोलले जाते. तरी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासन आता “जागेवर कोरोना चाचणी “ करण्याची कारवाई करणार आहे. म्हणुन विनाकारण बाहेर फिरणाऱ्या श्रीरामपूरकरांनी याबाबत खबरदारी घ्यावी.