शिवप्रहार न्युज - श्रीनिवृत्तीनाथांच्या पालखीचे श्रीरामपुरात “शिवप्रहार”सह सर्वांकडुन उत्साहात स्वागत...
श्रीनिवृत्तीनाथांच्या पालखीचे श्रीरामपुरात “शिवप्रहार”सह सर्वांकडुन उत्साहात स्वागत...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्रीनिवृत्तीनाथ महाराज पालखीचे शनिवारी श्रीरामपूर नगरीमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. या दिंडीमध्ये हजारो वारकरी महिला, पुरूष झालेले आहेत. टाळ मृदुंगाच्या गजरात या दिंडीचे खंडाळ्यापासूनच स्वागताला सुरूवात झाली.शिवछत्रपींच्या अठरापगड शिवहिंदुत्व विचारांवर कार्य करणारी संघटना “शिवप्रहार”च्या वतीने बेलापूररोड बजरंगनगर येथे दिंडीतील वारकरी बंधू-भगिनींना अल्पोपहारचे नियोजन करुन शिवप्रहारच्या मावळ्यांच्यावतीने हि सेवा देण्यात आली.
श्रीरामपुरात दिंडी आल्यानंतर दत्तनगर, नॉदर्न ब्रँचसह नेवासारोड, मेनरोड, बजरंगनगर-बेलापूररोड आदी ठिकाणी ठिकठिकाणच्या विविध तरूण मंडळांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच व्यापारी वर्गाने दिंडीतील वारकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे खाऊचे आणि अन्नदानाच्या पाकीटांचे तसेच बिस्किट पुडे, पाण्याची व्यवस्था केली होती. श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती महाराजांच्या दिडींतील वारकऱ्यांना वेगवेगळे पदार्थ देवून त्यांचे स्वागत करून दिंडीला बेलापूररोडच्या नाक्यापर्यंत वाटी लावण्याची प्रथा आहे. यंदाही या दिंडीचे श्रीरामपुरात अत्यंत जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले.