शिवप्रहार न्युज - पहिल्या श्रावणी शनिवारी “भद्रा मारुती” येथे ०३ लाख भाविकांची गर्दी…
पहिल्या श्रावणी शनिवारी “भद्रा मारुती” येथे ०३ लाख भाविकांची गर्दी…
नेवासा(प्रतिनिधी)पहिल्या श्रावणी शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील रत्नपूर भद्रा मारुती येथे सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली "बजरंग बली की जय"पवनपुत्र हनुमान की जय"जय श्रीराम" च्या गजराने परिसर दुमदुमला होता.
श्रावणी शनिवारच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास मंदिर परिसरात बेलांच्या पानांची सजावट करून भद्रा मारुती हनुमंतरायास वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य बंडू गुरू,बाळू गुरू,बबन सोनवणे, ज्ञानेश्वर नागे,आकाश जाधव,कस्तुरे गुरू यांनी केले.
यावेळी माजी खासदार व भद्रा मारुती संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत खैरे,संस्थानचे सचिव मंत्री अतुल सावे,अध्यक्ष मिठूभाऊ बारगळ, उपाध्यक्ष रामनाथ बारगळ,कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष पोपट जैन,विश्वस्त कचरू पाटील बारगळ,भूषण अग्रवाल, खंडेराव बारगळ,संस्थानचे सुरक्षा व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे उपस्थित होते.
श्रावणी शनिवार च्या निमित्ताने मध्यरात्री रात्री १२ वाजता वेदमंत्राच्या जयघोषात शंख नाद करून अभिषेक घालण्यात येऊन दर्शन सुरू करण्यात आले.भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य सेवा,रुग्णवाहिका सेवा पिण्याचे स्वच्छ पाणी व्यवस्था भद्रा मारुती मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती.पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिर प्रांगण भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.
आलेल्या सर्व भाविकांचे भद्रा मारुती देवस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी स्वागत केले. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून पोलीस स्टेशन, होमगार्ड पोलीस मित्र संघटनेच्या कर्मचारी वर्गाने उत्कृष्ट सेवा दिली.प्रभू रामचंद्र की जय ,पवन पुत्र हनुमान की जय च्या गजराने मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय बनले होते.
श्रावण महिन्यातील पहिल्याच शनिवारी सुमारे तीन लाख भाविकांनी गर्दी केली होती.दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता त्या दृष्टीने आम्ही सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात केली असून श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भद्रा मारुती देवस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी केले आहे