शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात गुटखा तस्करांवर LCB ची मोठी कारवाई..

शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात गुटखा तस्करांवर LCB ची मोठी कारवाई..

श्रीरामपुरात गुटखा तस्करांवर LCB ची मोठी कारवाई...

 

 

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुरात स्थानिक गुन्हे शाखा(LCB) ने मोठी कारवाई करत गुटख्याची तस्करी करणारे पकडले असून त्यांच्याकडून स्वीफ्ट कारसह तब्बल ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.तर तिघे फरार झाले आहेत.

   याबाबत अधिक माहिती अशी की, काल गुरूवार दि.८ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव-मातापूर रोडवर मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा टाकला. तेथे राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा पानमसाल्याच्या गोण्या दोघे- तिघेजण मारूंती इको गाडीतून शेजारी लावलेल्या स्वीफ्ट कारमध्ये टाकत होते. याचवेळी पोलिसांनी तेथे छापा टाकून आरीफ महेबूब शेख, बाबा गफूर तांबोळी, कलीम रहीम शाह यांना रंगेहाथ पकडले.त्यावेळी तेथून परवेज नवाब शेख हा पळून गेला आहे. पोलिसांनी आरोपींकडून गोण्यांमध्ये भरलेला केसरयुक्त हिरा मसाल्याचे तसेच रॉयल तंबाखूच्या पुड्यांच्या गोण्या तसेच राखाडी रंगाची मारूती कंपनीची इको क्र.एमएच ५० ए ०५१५, पांढऱ्या रंगाची मारूती स्वीफ्ट कार क्र. एमएच २० इसी ४१९४ सह ३ मोबाईल असा एकूण ९ लाख १६ हजार ४६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेल्या आरोपींनी सदरचा माल राहाता तालुक्यातील वाकडी येथील सद्दाम अकबर शेख तसेच बीड जिल्हयातील मोमीनपुरा येथील इकबाल शेख यांच्याकडून आणल्याचे सांगितले. 

      याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ. भाऊसाहेब काळे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी आरीफ महेबूब शेख, वय-३१, रा. येलमवाडी, जळगाव, ता. राहाता, बाबा गफूर तांबोळी, वय-४४, रा.अशोकनगर, ता. श्रीरामपूर, कलीम रहीम शाह, वय-३३, रा. पूनमनगर, शिर्डी, ता. राहाता तसेच फरार असलेले परवेज नवाब शेख, रा. श्रीरामपूर, सद्दाम अकबर शेख, रा. वाकडी, ता. राहाता, इकबाल शेख, रा. मोमीनपुरा, जि. बीड यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांच्या पथकातील पोकॉ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. गणेश भिंगारदे, पोकॉ. अमोल कोतकर, पोकॉ. मयुर गायकवाड, पोकॉ. अरूण मोरे यांनी केली आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.