शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर वकील संघासह मा.आमदार कांबळेंचा जिल्हा आंदोलनास पाठिंबा...
श्रीरामपूर वकील संघासह मा.आ.भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे नितीन दिनकर यांचा जिल्हा आंदोलनास पाठिंबा...
श्रीरामपूर -हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागणींसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थानचे मा.विश्वस्त श्री. प्रताप नाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवप्रहारप्रमुख, माजी PSI श्री.सुरजभाई आगे,कार्याध्यक्ष चंद्रशेखर(चंदू)आगे यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.
आज आंदोलनाच्या ११ व्या दिवशी श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विष्णू ताके ,उपाध्यक्ष ॲड.सुभाष जंगले,महिला उपाध्यक्ष ॲड.मनीषा वर्मा, सचिव ॲड.कैलास आगे,खजिनदार ॲड.अण्णासाहेब मोहन, ॲड.एस.एस.बागवान,ॲड.डी.एच.पुंड, ॲड.एस.के.चोरमल,ॲड.आर.डी.भोसले,ॲड.एस.बी.पाठक,ॲड.रमाकांतजी राठोड,ॲड.बी.एच. ढोकचौळे, ॲड.एस.एन.तांबे,ॲड.निघुट, ॲड.अजित उघडे,ॲड.एस.पी.घोरपडे,ॲड.बी.बी.शिंदे,ॲड.विजय साळुंखे,ॲड.सचिन नरवडे,ॲड.आकाश गायकवाड,ॲड.आशिष भोसले,ॲड.भूषण वैराळ,ॲड.अरिफ शेख,ॲड.अक्षय आगे,ॲड.प्रवीण लिप्टे, ॲड.ए.डी.मिरीकर, ॲड.ऋषिकेश बोर्डे,ॲड.प्रतीक खंडागळे,ॲड.पवन दिवटे,ॲड.मयूर भिसे इत्यादी वकीलमंडळींनी प्रत्यक्ष येवुन पाठिंबा दिला.
तसेच शिवसेना शिंदे गटाचे मा.आमदार भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे नेते नितीन दिनकर , भैरवनाथनगरचे सरपंच प्रवीण फरगडे पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संतोष मोकळ, बहुजन समाज पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष कैलास ठोंबरे,पथविक्रेता संघटनेचे भैया भिसे, अक्षय गाडेकर, बेलापूरचे किशोर कांबळे,मातुलठाणचे विकास बोर्डे ,प्रताप बोर्डे,शिरसगावचे विशाल बोंबले,महेश पवार,विजय पाचरणे,मातापूरचे बापुसाहेब उंडे,गोंधवणीचे डॉक्टर फरगडे पाटील, युवासेनेचे दत्तात्रय करडे, अंबिका पतसंस्थेचे ए. के .जाधव ,आर.एन.काकडे ,किशोर पवार यांनी समक्ष भेटून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिवसेंदिवस या जनआंदोलनाला सर्वस्तरातुन पाठिंबा वाढतच चालला आहे.