शिवप्रहार न्यूज- रेणुकामाता मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी चिल्लर जागेवर सोडून नोटा पळवल्या…

शिवप्रहार न्यूज- रेणुकामाता मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी चिल्लर जागेवर सोडून नोटा पळवल्या…

रेणुकामाता मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी चिल्लर जागेवर सोडून नोटा पळवल्या…

 श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावातील रेणुकामाता मंदिरामध्ये असणाऱ्या दानपेटीतील नोटा काल रात्री चोरट्यांनी चोरून नेल्या.

        दानपेटी बाहेरून लॅाक असल्यामुळे हा लॅाक चोरट्यांकडून फुटला नाही.म्हणून त्यांनी खालच्या बाजूने दानपेटी कट करून त्यामधील भाविकांनी भक्तिभावाने अर्पण केलेल्या देणगी स्वरूपातील नोटा चोरून नेल्या.परंतु दानपेटी मधील मोठ्या प्रमाणात असलेली चिल्लर चोरट्यांनी जागेवरच टाकून दिली आणि चोरटे पळून गेले.

       याप्रकरणी ग्रामस्थांनी श्रीरामपूर पोलिसांना कळविले असून पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.