शिवप्रहार न्युज - जिल्हा आंदोलनास केमिस्ट असोसिएशनसह, पत्रकार संघटनेचा पाठिंबा...
जिल्हा आंदोलनास केमिस्ट असोसिएशनसह, पत्रकार संघटनेचा पाठिंबा...
श्रीरामपूर - हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागणींसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थानचे मा.विश्वस्त श्री. प्रताप नाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवप्रहारप्रमुख, माजी PSI श्री.सुरजभाई आगे,कार्याध्यक्ष चंद्रशेखर(चंदू)आगे यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.
आज आंदोलनाच्या १२ व्या दिवशी श्रीरामपूर तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे शशांक रासकर, रविंद्र गुलाटी, सुजित राऊत, माधव आसने, बाजीराव कोवील, राहूल कुर्हे, सचिन चुडीवाल, प्रशांत उचित, आनंद कोठारी, बाळासाहेब ढेरंगे, ओमप्रकाश नारंग, उदय बधे यांनी प्रत्यक्ष येवुन पाठिंबा दिला.
तसेच मराठी पत्रकार संघाचे करण नवले, नागेशभाई सावंत, पद्माकर शिंपी, राहुल मुथ्था, नितीन चित्ते, विशाल वर्धावे, सचिन उघडे, मधुकर माळवे काका, दिपक उंडे, संतोष बनकर, जयेश सावंत, मयुर पांडे यांच्यासह स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषिराज टकले यांनी समक्ष भेटून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिवसेंदिवस या जनआंदोलनाला सर्वस्तरातुन पाठिंबा वाढतच चालला आहे.