शिवप्रहार न्युज - रामगिरीमहाराज-राणे भेटीचा फोटो स्टेटसला ठेवल्याने श्रीरामपुरात विद्यार्थ्याला मारहाण! धक्का लागल्याने मारहाण- श्रीरामपूर पोलीसांचा चौकशीअंती दावा …

शिवप्रहार न्युज -  रामगिरीमहाराज-राणे भेटीचा फोटो स्टेटसला ठेवल्याने श्रीरामपुरात विद्यार्थ्याला मारहाण! धक्का लागल्याने मारहाण- श्रीरामपूर पोलीसांचा चौकशीअंती दावा …

रामगिरीमहाराज-राणे भेटीचा फोटो स्टेटसला ठेवल्याने श्रीरामपुरात विद्यार्थ्याला मारहाण! धक्का लागल्याने मारहाण- श्रीरामपूर पोलीसांचा चौकशीअंती दावा …

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) सरालाबेट गोदाधाम येथे महंत रामगिरी महाराज यांच्या भेटीला भाजपाचे आ.निलेश राणे हे गेले होते.त्यांच्या भेटीचा फोटो बोरावके कॉलेजचा विद्यार्थी प्रदिप विटेकर याने त्याच्या मोबाईलवर स्टेटसला ठेवला होता.याचा राग धरून आरोपी रिजवान शेख व अन्य त्याचे तीन साथीदार यांनी आरबीएनबी बोरावके कॉलेजच्या गेटवर प्रदिप विटेकर या विद्यार्थ्याला धरून बेदम मारहाण केली.तसेच रिजवान शेख याने बेल्टने प्रदिपचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला. बेल्ट,चॉपर,फायटरने बेदम मारहाण केली. तोंडावर कानाच्या मागे, डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भर दिवसा बोरावके कॉलेजच्या गेटवर हा थरारक प्रकार घडल्याने तेथे एकच खळबळ उडाली होती.

        दरम्यान जखमी प्रदिप विटेकर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याने श्रीरामपूर शहर पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी रिजवान शेख व इतर ३ जण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २० २ ३ चे कलम १०९,११८ ( १ ) ,११५ (२ ),३१५(२ )३ (५) प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक कलुबर्मे,पोनि देशमुख यांनी तातडीने भेट दिली.फरार आरोपींचा शोध पोसई समाधान सोळंके हे करीत आहेत.

           याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि. नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्हयाचा तपास केल्यानंतर असे पुढे आले की, सदर मुलाचा धक्का लागल्याने रिजवानने त्याचे मित्र बोलावून त्या मुलाला मारहाण केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.अधिक तपास सुरू असल्याचे पोनि. देशमुख यांनी सांगितले.

       महंत रामगिरी महाराज यांचे समर्थनार्थ कालच महाकाली भक्त कालीचरण महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूरात मोर्चा व जाहिर सभा झाली. त्याच दिवशी हा खुनाच्या प्रयत्नाचा प्रकार घडला.काल पोलीसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.