शिवप्रहार न्यूज- शिक्षक दाम्पत्याच्या 15 वर्षीय मुलाच्या आत्महत्या प्रकरणी श्रीरामपुरातील शिक्षक सराफ,साठेंवर गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्यूज-  शिक्षक दाम्पत्याच्या 15 वर्षीय मुलाच्या आत्महत्या प्रकरणी श्रीरामपुरातील शिक्षक सराफ,साठेंवर गुन्हा दाखल…

शिक्षक दाम्पत्याच्या 15 वर्षीय मुलाच्या आत्महत्या प्रकरणी श्रीरामपुरातील शिक्षक सराफ,साठेंवर गुन्हा दाखल…

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- “तू लंगडा आहेस त्यामुळे तू एनसीसीला पात्र नाही,असे म्हणत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याला NCC मधुन वगळण्यात आल्याने आणि शिक्षकांचे हे वागणे सहन न झाल्याने अथर्व नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या आत्महत्येस दोघा शिक्षकांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील मोर्डन/पाटणी शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणारा अथर्व हा अगोदरपासूनच एनसीसीमध्ये होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याचा पाय मोडला होता. त्यामुळे यावेळेस तू लंगडा आहे, तू पात्र नाही, असे म्हणून त्याला वगळण्यात आले होते. त्याला शिक्षकांचे असे वागणे सहन न झाल्याने अथर्वने काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आईही त्याच शाळेच्या शिक्षिका आहे तर वडील हे वांबोरी येथील एका शाळेत शिक्षक म्हणून आहेत. 

        या दोन शिक्षकांमुळेच अथर्वने आत्महत्या केली असून ते त्याच्या मृत्यूस कारणीभूत आहेत असे त्याची आई जयश्री लोहकरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी | पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ९५४ / २०२२ प्रमाणे शाळेचे शिक्षक अभिजित शशिकांत सराफ व भूषण प्रभाकर साठे या दोन शिक्षकांविरुध्द भादंवि कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काल या दोघा शिक्षकांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणुन अर्ज दाखल केला. म्हणून न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.