शिवप्रहार न्युज - मोबाईल फोन लुटणारे सराईत आरोपीतांकडुन 1,55,700/- रु किं. चा मुहमाल जप्त;श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई…
मोबाईल फोन लुटणारे सराईत आरोपीतांकडुन 1,55,700/- रु किं. चा मुहमाल जप्त;श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई…
श्रीरामपूर- दिनांक 14/08/2024 रोजी फिर्यादी बबन पोपट पठारे रा.सहयाद्री इंजिनिअरिंग, एम.आय.डी.सी. खंडाळा ,श्रीरामपूर हे सांयकाळी 07/30 वा.चे सुमारास कंपनीतील कामावरुन सुट्टी झाल्यानंतर किराणा आणण्याकरीता कंपनीतुन निघुन वाकडी ते दत्तनगर रोडने दत्तनगरकडे कंपनीची टी.व्ही.एस. मोटारसायकलवर जात असतांना ०३ अनोळखी चोरटयांनी मोटारसायकल आडवुन लाथाबुक्यांनी व कमरेच्या बेल्टने मारहाण करुन त्यांच्या खिश्यातील पैसे व मोबाईल बळजबरीने काढुन घेवुन गेले म्हणुन तीन अनोळखी चोरट्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 812/2024 बीएनएस कलम 309 (6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल होताच मा.पोनि. नितीन देशमुख यांनी सदर गुन्हयातील गेले मालाचा व अनोळखी चोरट्याचा शोध घेवुन त्यांना तात्काळ अटक करण्याचे तपास पथकास आदेश दिल्याने तपास पथकाने सदर घटनास्थळी जावुन पाहणी करुन तसेच तांत्रिक विश्लेषन करुन तसेच गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे मयुर विजय काळे रा.सुतगिरणी रेणुकानगर दत्तनगर श्रीरामपुर व त्याचे साथीदार 2) रोहिदास सोपान रामटेके रा. रांजणखोल ग्रामपंचायत समोर ता. श्रीरामपूर 3) दत्तु उर्फ हेमंत किशोर शेळके रा. महाराष्ट्र वाईनशॉप पाठीमागे श्रीरामपुर यांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीताचा शोध घेत असतांना अशी माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे त्यांचे राहते घरी आले असुन ते पळुन जाण्याच्या तयारीत आहेत. अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालाने तपास पथकाने मा. पोनि.नितीन देशमुख यांच्या आदेशाने तीन टिम बनवुन तात्काळ तिन्ही आरोपीच्या राहते घरी रवाना होवुन त्याचा शोध घेतला असता त्यातील आरोपी क्रं.01) मयुर विजय काळे 2) रोहिदास सोपान रामटेके हे त्याचे राहते घरी मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे नमुद गुन्हयाबाबत तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा आमचा आरोपी साथीदार क्रं.03 दत्तु उर्फ हेमंत किशोर शेळके यांच्यासह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना तात्काळ नमुद गुन्हयात अटक करुन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांच्याकडुन नमुद गुन्हयातील तसेच एम.आय.डी.सी. खंडाळा, श्रीरामपूर परिसरातुन वेळोवेळी बळजबरीने हिसकावुन नेलेले मोबाईल व रोख रक्कम तसेच सदरचा गुन्हा करताना वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
जप्त मुद्देमाल खालीलप्रमाणे-
७००/- रु. रोख रक्कम ।यात विविध दराच्या चलनी नोटा, (गुरंन.८१२/२०२४ पीएनएम ३०९ (६) प्रमाणे दाखल गुन्हयातील)
१०,०००/- रु. किचा विवो कंपनीचा २२ गोवाईल त्याचा IMELNO १) ८६२८०७०६८५२०५५५. २१८६२८०७०६८५२०५४८ ज. या. किं अंदाजे. (गुरंन.८१२/२०२४ थीएनएम ३०९ (६) प्रमाणे दाखल गुन्हयातील)
७०००/- रु.कि.चा. INFININ या कंपनीचा आकाशी निळ्या रंगाचा मोबाईल जुयाकिंअ. (गुरेव ८१९ २०२४ चीएनएम ३०१ (६) प्रमाणे दाखल गुन्हयातील)
५००० रु. किं. घा लाग्हा कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल जुयाकिंअ. (गुरंन.८२०/२०२४ पीएनएम ३०९ (६) प्रमाणे दाखल गुन्हयातील)
१०,०००/-रु. कि, घा सॅमसंग गॅलक्सी. ०२. मोबाईल त्याचा IMELNO. १०३५०७५६६६७८०६९७३ २) ३५१२५०९४७८०६९७८ जू.वा. किं अंदाजे.
१०,०००/-रु. कि.चा रेडमी (३० मोबाईल त्याचा IMEI.NO. १)८६९५४२०६१३८७९९२ २)८६९५४१०६१३८७९८४ जु.वा, कि अंदाजे.
३०००/-रु. कि.चा जियो मोबाईल फोन त्याचा IMEI NO.१) ३५२७३४४५२०१०८०२ २)३५२७३४४५२०१०८०१ जु.वा. कि अंदाजे.
१०,०००/रु. कि.चा. REALME या कंपनीचा दुधी (क्रीम कलर) रंगाचा मोबाईल जुवाकिअ. ९०,०००/- रु. कि.ची काळया रंगाची हिरो स्पेल्डर प्लस मोटार सायकल गाडी नंबर एम.एच.१७ डी.ए.००२६ व तीचा चेसी नं. MBLHAW२२२१९८११७४७ अशी असलेली जुवाकिंअ, १.५५.७००/- रु. एकुण किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला तीन दाखल गुन्हे तात्काळ उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा. श्री. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि. पोलीस उपनिरिक्षक दिपक मेढे, पोकॉ राहुल नरवडे, पोना/ आर. कारखेले, पोना/किशोर अवताडे, पोकों/रामजराजा अत्तार, पोकों/गौतम लगड, पोकों/संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे, पोकों/ कातकाडे, पोकॉ/ रमेश रोकडे, पोकॉ/ कैलास झिने, पोकों/रामेश्वर तारडे, पोकों/ ए. आंधळे, पोकों/कुदिलप पर्बत, पोकॉ/ राहुल पौळ, मपोका/मिरा सरग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/ संतोष दरेकर, पोना/ सचिन धनाड, पोकॉ/ वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे हे करीत आहेत.