शिवप्रहार न्युज - राहुरी तालुक्यातून आंदोलनास पाठिंबा सुरु;आज आंदोलनाचा २० वा दिवस ...

शिवप्रहार न्युज -  राहुरी तालुक्यातून आंदोलनास पाठिंबा सुरु;आज आंदोलनाचा २० वा दिवस ...

राहुरी तालुक्यातून आंदोलनास पाठिंबा सुरु;आज आंदोलनाचा २० वा दिवस ...

श्रीरामपूर -हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागण्यांसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व "शिवप्रहार"च्या माध्यमातुन चालू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनास आज २० व्या दिवशी राहुरी तालुक्यातील वळण ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू मकासरे,राहुरी खुर्द ग्रामपंचायत चे शिवाजी शेंडे, गुहाचे किरण उर्हे,अक्षय चंद्रे,चिंचविहिरे येथील शिवकार्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज हासे पाटील यांनी प्रत्यक्ष येवुन पाठिंबा दिला. 

       तसेच रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे सचिन वेताळ, बाबासाहेब वेताळ, गोरख वेताळ यांच्यासह ह.भ.प सुदाम महाराज चौधरी,अशोकनगरचे शरद पंडित,मदन कर्डिले,भोकरचे मच्छिंद्र काळे,गळनिंबचे संदीप शेरमाळे,गंगाधर भोसले कारेगावचे राहुल नागुडे,नाऊरचे स्वप्निल देसाई ,पिंपळगाव फुणगीचे शिवम तोरे,चांदेगावचे सुमित गायकवाड,शहरातील श्रीकांत करीर,शुभम शिरसाट,गौरव लबडे इत्यादींच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष येवुन पाठिंबा दिला.