शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी उद्या श्रीरामपूर बंद;बंदला “शिवप्रहार”चा पूर्णत: पाठिंबा...

शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी उद्या श्रीरामपूर बंद;बंदला “शिवप्रहार”चा पूर्णत: पाठिंबा...

श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी उद्या श्रीरामपूर बंद;बंदला “शिवप्रहार”चा पूर्णत: पाठिंबा...

 श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- नुकतेच शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने श्रीरामपूरकरांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. भौगोलिक दृष्ट्या व मेरिटच्या आधारावर श्रीरामपूरच जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण व्हावे अशी श्रीरामपूरकरांची मागणी आहे आणि तेच आजूबाजूच्या तालुक्यातल्या नागरिकांसाठी देखील सोयीचे आहे. परंतु सरकारने श्रीरामपूर ऐवजी शिर्डीला प्राधान्य देत तेथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.श्री.क्षेत्र शिर्डी हे जागतिक पातळीचे धार्मिक स्थळ असल्याने तेथे ऑलरेडी प्रचंड गर्दी असते.त्यात जिल्हा पातळीचे कार्यालय सरकारने तिकडे नेल्याने अजून गर्दीत भर पडून स्थानिक जिल्ह्यातील नागरिकांना तेथील गर्दीचा व महागाईचा प्रचंड त्रास होणार आहे.

    गेल्या 40-42 वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी श्रीरामपूरकरांची मागणी आहे. तसेच ही मागणी रास्त देखील असून सरकारने अद्याप पर्यंत ती पूर्ण केलेले नाही. श्रीरामपूर मध्ये आरटीओ कार्यालय, पासपोर्ट कार्यालय, विभागीय एसटी कार्यशाळा, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, विभागीय पोस्ट ऑफिस कार्यालय यासारखे जिल्हा पातळीचे कार्यालय आहेत. तरीदेखील सरकारने कुठेतरी अन्याय केल्याची भावना श्रीरामपूरकरांमध्ये असून त्यामुळे सर्व पक्षीय श्रीरामपूरकरांनी व व्यापारी-व्यावसायिक बांधवांनी सरकारच्या निर्णयाविरोधात श्रीरामपूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

    श्रीरामपूर बंदच्या या निर्णयाला शिवछत्रपतींच्या अठरापगड जातीच्या विचारांवर कार्य करणाऱ्या “शिवप्रहार प्रतिष्ठान”संघटनेचा पूर्णतःपाठिंबा आहे.