शिवप्रहार न्युज - आंदोलनाला ४० दिवस पूर्ण; उद्या मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिणार...
आंदोलनाला ४० दिवस पूर्ण; उद्या मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिणार...
श्रीरामपूर - छत्रपती शिवाजी महाराज चौकातील "शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा" घोषित करावा या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहार प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला आज 40 दिवस पूर्ण झाले आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून हे आंदोलन शहरातील बेलापूररोड,बजरंगनगर या ठिकाणी चालू आहे.श्रीरामपूरच्या इतिहासात तब्बल 40 दिवस चाललेले हे पहिलेच आंदोलन आहे.
दरम्यान आंदोलनाला जवळपास सर्वच क्षेत्रातल्या श्रीरामपूरकरांनी तसेच कट्टर शिवभक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन भरघोस पाठिंबा दिला आहे.तरी आंदोलनास 40 दिवस पूर्ण झाल्याने त्यानिमित्ताने उद्या 41 व्या दिवशी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना मागण्या पूर्ण करण्याचे साकडे घालण्यासाठी रक्ताने पत्र लिहिण्यात येणार असल्याचे कृती समिती व शिवप्रहार च्या वतीने सांगण्यात आले.