शिवप्रहार न्यूज - विद्यार्थीनीं-मुलींनो तक्रारी करा,घाबरू नका! -अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर ; छेडाछाड करणार्यांना पोलीसप्रसाद…

शिवप्रहार न्यूज - विद्यार्थीनीं-मुलींनो तक्रारी करा,घाबरू नका! -अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर ; छेडाछाड करणार्यांना पोलीसप्रसाद…

विद्यार्थीनीं-मुलींनो तक्रारी करा,घाबरू नका! -अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर ; छेडाछाड करणार्यांना पोलीसप्रसाद…

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज ) - शाळेत कॉलेजला येता-जाता विद्यार्थीनी व मुलींची कोणी छेडछाड करत असेल तर मुलींनो घाबरू नका ! तक्रार करा पोलीस टवाळखोरांना धडा शिकवतील असे स्पष्ट प्रतिपादन तथा आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी केले आहे . 

      जिल्ह्याच्या अनेक भागात महीला -मुली -विद्यार्थीनी यांच्या छेडछाडीच्या घटना घडत आहेत . अनेक वेळा मुली तक्रार देण्याचे भिती पोटी टाळतात. मात्र आता कर्तव्यदक्ष महीला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी तुम्ही घाबरू नका तक्रार करा असे आवाहन नवरात्रीच्या पूर्व संधेला केले.त्यामुळे मुली -विद्यार्थीनीनीं चंडीका बनून छेडछाड करणा-यांना धडा शिकविन्यासाठी पुढे आले पाहीजे ! 

      या परिस्थितीवर आमच्या प्रतिनिधीशि बोलतांना स्वाती भोर यांनी सांगीतले की,श्रीरामपूर ,राहुरी ,लोणी,राहाता,शिर्डी कोपरगांव,संगममेर,अकोले आदि पोलीस ठाण्यांना आदेश देण्यात आले असून महाविद्यालय शाळा परिसरात छेडछाड करणाऱ्‍यावर कारवाई सुरु झाली आहे.

       संगमनेर ,श्रीरामपूर व राहुरी परिसरात तिथले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी छेडछाड करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली ! टिबल शिट ! गाडीची कागदपत्रे नसणे ! गाडीवरमोबाईल वर बोलणे ! कालेजचे ओळखपत्र नसने अशांवर कारवाई करण्यात आली आहे.लवकरच महाविद्यालये व शाळा यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांची बैठक घेवून कॉलेज व शाळेत तक्रार पेटी बसविन्याचे काम होणार असून या तक्रार पेटीत विद्यार्थीनी -मुली व शिक्षिका यांना छेडछाडीचा त्रास असल्यास छेडछाड करणार्यांचे नाव व तक्रारचिठ्ठी टाकावी.ते पोलीस तपासतील व छेडछाड करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल ! तक्रारदार मुलीचे नाव गुप्त ठेवले जाईल असे सांगुन अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी मुली विद्यार्थीनीनी घाबरू नये आणि तक्रार करावी असे आवाहन केले आहे ! छेडछाड करना-यांना पोलीस प्रसाद मिळत आहे ! 

         महीला -मुली-विद्यार्थीनींमधून तसेच पालकांमधून अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या भुमिकेचे स्वागत होत आहे !