शिवप्रहार न्युज - "हे हनुमंता शक्ती दे, ग्रामपंचायतला बुद्धी दे"; आमरण उपोषण सुरु...

शिवप्रहार न्युज - "हे हनुमंता शक्ती दे, ग्रामपंचायतला बुद्धी दे"; आमरण उपोषण सुरु...

"हे हनुमंता शक्ती दे, ग्रामपंचायतला बुद्धी दे"; आमरण उपोषण सुरु...

 श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावातील हनुमान मंदिर परिसरामध्ये मंदिराच्या जागेत अभ्यासिका बांधण्याचा घाट ग्रामपंचायतने घातला आहे.यावरून गावात गेल्या काही महिन्यांपासून वादाचे वातावरण तयार झाले आहे.

        दरम्यान ग्रामपंचायतीने हनुमान मंदिरात व इतर कोणत्याही मंदिरात अभ्यासिका बांधू नये.इतरत्र ठिकाणी कुठेही अभ्यासिका बांधावी. यासाठी टाकळीभान गावातील अठरापगड जातीच्या हिंदुत्ववादी तरुणांसह जागरूक नागरिकांनी हे आमरण उपोषण कालपासून चालू केले आहे."हे हनुमंता शक्ती दे, ग्रामपंचायतला बुद्धी दे"अशा आशयाचे उपोषणस्थळी बॅनर लागले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निषेध म्हणून हे उपोषण केले जात आहे.