शिवप्रहार न्यूज -दारू पिऊन धिंगाणा घालतो म्हणून बाप,चुलत भाऊ व आतेभावानी मिळुन तरुणाचा केला मर्डर...

शिवप्रहार न्यूज -दारू पिऊन धिंगाणा घालतो म्हणून बाप,चुलत भाऊ व आतेभावानी मिळुन तरुणाचा केला मर्डर...

दारू पिऊन धिंगाणा घालतो म्हणून बाप,चुलत भाऊ व आतेभावानी मिळुन तरुणाचा केला मर्डर...

 राहता -राहाता तालुक्यातील नपावाडी शिवारात असलेल्या सदाफळ वस्तीवर राहणारा इसम अशोक गोपीनाथ धनवटे, वय 28 हा दारू पिऊन घरातील लोकांना त्रास देतो या कारणावरून आरोपी ०१)गोपीनाथ धनवटे ०२) कमल धनवटे ०३)धनंजय धनवटे ०४) सागर खरात रा.राहता यांनी मिळून मयत अशोक याला लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण करून त्याची हत्या केली म्हणून राहता पोलीस ठाण्यात काल गुन्हा रजिस्टर नंबर 93 /2021 भादवि कलम 302 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           या घटनेने राहता परिसरात खळबळ उडाली असुन दारू पिऊन धिंगाणा घालण्याची सवय या तरुणाच्या जीवावर बेतल्याचे दिसत आहे. या गुन्ह्याच्या घटनास्थळी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सौ.दीपाली काळे यांनी भेट दिली. 

            तसेच या गुन्ह्याचा तपास राहता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.भोये हे करीत आहेत. एकुण ०४ आरोपींपैकी ०३ आरोपींना तात्काळ अटक केल्याचे पो.नि.श्री. भोये यांनी शिवप्रहार न्युज शी बोलतांना सांगितले.