शिवप्रहार न्युज - ऐन दिवाळीत भारनियम; महावितरणवर नागरिकांचा संताप 

शिवप्रहार न्युज - ऐन दिवाळीत भारनियम; महावितरणवर नागरिकांचा संताप 

ऐन दिवाळीत भारनियम; महावितरणवर नागरिकांचा संताप 

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात लाईटची ये-जा सुरू आहे. कालपासून हिंदूंच्या सर्वात मोठ्या सणाला म्हणजेच दिवाळीला सुरूवात झाली असून आज मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीरामपुरातील अनेक भागांमध्ये सकाळच्या वेळी लाईट गेली होती.

    तसेच आज संध्याकाळीही श्रीरामपूर शहरातील काही भागांमध्ये लाईट ये-जा करत असल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांनी महावितरणवर संताप व्यक्त केला आहे. महावितरणने ऐन दिवाळीत सुरू केलेले हे भारनियमन थांबवून सणासुदीला सुरळीत वीजपुरवठा करावा अशी मागणी श्रीरामपूरांनी केली आहे.