शिवप्रहार न्यूज- “बातमीनंतर” टाकळीभानमध्ये ठेकेदाराने तात्काळ खडी टाकल्याने व्यावसायिकांना दिलासा…

“बातमीनंतर” टाकळीभानमध्ये ठेकेदाराने तात्काळ खडी टाकल्याने व्यावसायिकांना दिलासा…
टाकळीभान - गेल्या काही दिवसापासुन गावात श्रीरामपूर-नेवासा या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम चालू केले असून त्यासाठी ठेकेदार नेमले आहेत.या ठेकेदाराने रस्त्याचे रुंदीकरण करतांना बाजुला दहा फूट रस्ता खोदून ठेवला होता.त्यामुळे व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांची प्रचंड अडचण होत होती व व्यावसायिकांना देखील आर्थिक फटका बसत होता.
अशा आशयाची बातमी काल “शिवप्रहार न्युज” ने प्रसारित केल्यानंतर आज सोमवारी ठेकेदाराने व्यवसायिकांची व नागरिकांची होत असलेली गैरसोय रोखण्यासाठी खोदलेल्या जागेत खडी टाकण्याचे काम तात्काळ केले.यामुळे व्यावसायिकांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.