शिवप्रहार न्युज - बेलापूर परिसरात दरोडा; दागिने चोरून,दिवाळीची पुरणपोळी खाऊन चोरटे लंपास…
बेलापूर परिसरात दरोडा; दागिने चोरून,दिवाळीची पुरणपोळी खाऊन चोरटे लंपास…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावाजवळील गोखलेवाडी परिसरात राहणाऱ्या कचरू कुऱ्हे या ग्रामस्थाच्या घरावर दिवाळीच्या रात्री दरोडा पडला.यामध्ये ४-५ चोरट्यांनी झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले कानातील दागिने व काही रोख रक्कम चोरून नेले.तसेच यावेळी चोरट्यांनी दिवाळीच्या सणानिमित्ताने घरात बनवलेले पुरणपोळी व सारभात यावर ताव मारून चोरटे लंपास झाले.
दरम्यान घरातील लोकांनी झोपेतून उठून आरडाओरडा केला असता हे चोरटे पळून गेले.याबाबत कुऱ्हे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. जवळच्या परिसरातील चोरट्यांनीच हे कांड केल्याची चर्चा चालू आहे.