शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या दोघांना गावठी कट्टयासह गळनिंब परिसरात धरले…
श्रीरामपूरच्या दोघांना गावठी कट्टयासह गळनिंब परिसरात धरले…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याचे दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना लोणी पोलिस ठाणे अतंर्गत असलेल्या कोल्हार परीसरात त्यांनी गावठी कट्ट्यासह ०२ आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, पोहेका फुरकान शेख, रोहित येमुल, सागर ससाणे, रणजित जाधव, प्रशांत राठोड, रमीजराजा आतार यांचे पथकास गुप्त बातमीदारामार्फत दोन इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा त्याचे कब्जात बाळगुन ते विक्री करण्याचे उद्देशाने कोल्हार ते बेलापूर जाणारे रोडवरील ओमसाई सर्व्हस स्टेशनजवळ, गळनिंब शिवार या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ सापळा रचून थांबले असता ओमसाई सर्व्हस स्टेशनजवळ दोन संशयीत इसम येवून थांबले. पथकाने दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांची नावे ऋषिकेश कैलास जाधव, रा. सुतगिरणी, श्रीरामपूर, परवेज जमीर शेख रा. आय.डी.बी. आय.बॅक समोर, नेवासा रोड,वार्ड नं. ६, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जामध्ये ३० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व १ हजार रुपये किमतीचे ०१ जिवंत काडतुस असा एकुण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुध्द पो.कॉ. रमीजराजा रफिक आत्तार यांचे फिर्यादीवरुन लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१७/२०२४ आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी पोलीस ठाणे करीत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व तपास पथकाने केली आहे.